Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning 18th October 2023 Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांकडून अटकेबाबत गोपनीयता

पुणे:  पुण्यातील (Pune News)  ससून रुग्णालयातून  (Sasoon Hospital Drug Racket)   पसार झालेल्या ड्रग माफिया ललित पाटीलला (Lalit Patil Arrested) अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी ललित पाटीलला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून अटकेबाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे. वाचा सविस्तर 

Mumbai Pollution : मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईतील हवेचा दर्जा खालावला, धुलीकणांचं प्रमाण अतिधोकादायक पातळीवर

मुंबई:  मुंबईत पावसाळ्यात हवेची गुणवत्ता (Mumbai Air Pollution)  चांगल्या श्रेणीत होती.  मान्सून (Monsoon Withdrawl) परतल्यानंतर वाऱ्यांचा वेग मंदावला असून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे वाढत्या ऑक्टोबर हिटसोबत (October Heat) मुंबईकरांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. वाचा सविस्तर 

Tamil Nadu Blast : तामिळनाडूत दोन फटाक्यांचा कारखान्यांत स्फोट, 11 जणांचा मृत्यू

Tamilnadu Firecracker Explosions : तामिळनाडूमध्ये दोन वेगवेगळ्या फटाक्यांचा कारखान्यांत स्फोट झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील रंगापालयम आणि किचिन्यकनपट्टी येथील दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये मंगळवार या दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाचा सविस्तर 

आनंदवार्ता! केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, पण कोणत्या गटातील कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळणार?

Central Government Employees Diwali Bonus: सणासुदीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government) केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. केंद्र सरकारनं मंगळवारी 2022-23 या वर्षासाठी अ-राजपत्रित (Non Gazetted) गट B आणि गट C कर्मचार्‍यांसाठी नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस जाहीर केला आहे. यामध्ये गट क आणि ब गटातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस (Diwali Bonus) म्हणून एक महिन्याच्या पगाराएवढी रक्कम दिली जाणार आहे. वाचा सविस्तर 

Weather Update : पूर्व आणि ईशान्य भारतातून मान्सूनची माघार; केरळसह तामिळनाडूमध्ये अतिवृष्टी; कसं असेल आजचं हवामान

Weather Update Today : देशात (India Weather Today) काही भागात ऊन (Heat) तर काही भागात पाऊस (Rain) पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये थंडीची चाहूलही लागली आहे. देशाच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली असली, तरी देशाच्या काही भागांतून अद्याप मान्सून पूर्णपणे (Monsoon Return) माघारी परतलेला नाही. केरळ, तामिळनाडू राज्यांमध्ये गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज म्हणजेच बुधवारी, 18 ऑक्टोबरला राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर 

RBI News: RBI ची मोठी कारवाई, ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँकांना ठोठावला 16.14 कोटींचा दंड

RBI Fines ICICI Bank & Kotak Mahindra Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) या दोन्ही खाजगी क्षेत्रातील बँकांवर दंड ठोठावला आहे. RBI नं ICICI बँकेला 12.19 कोटी रुपये आणि कोटक महिंद्रा बँकेला 3.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाचा सविस्तर 

Israel Gaza Attack : इस्रायलकडून गाझामधील रुग्णालयावर एअरस्ट्राईक, 500 जणांचा मृत्यू; हमासचा दावा

Israeli Airstrike At Gaza Hospital : इस्रायल-हमास युद्ध (Israel Hamas War) चा आज 12 वा दिवस आहे. हमास आणि इस्रायलकडून एकमेकांवर सातत्याने हल्ले सुरुच आहेत. आता इस्रायलकडून गाझामधील रुग्णालयावर एअरस्ट्राईक केल्याचा दावा हमासने केला आहे. हमासने म्हटलं आहे की, 17 ऑक्टोबरला रात्री 10 वाजेच्या सुमारास इस्रायलने गाझा पट्टीतील रुग्णालयावर हल्ला केली. या एअरस्ट्राईकमध्ये 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर 

IND vs BAN : एकदिवसीय सामन्यात भारताचं पारड जड, तरीही टीम इंडियाला सावध राहण्याची गरज; पण नेमकं कारण काय?

India vs Bangladesh : विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) चांगली कामगिरी करताना दिसत आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 ऑक्टोबर रोजी सामना रंगणार आहे. विश्वचषकात भारताने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यानंतर भारत गुणतालिकेत संघ पहिल्या स्थानावर आहे. गेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केला होता. वाचा सविस्तर 

18 October In History : संशोधक एडिसन यांचा स्मृतीदिन, अभिनेता ओम पुरी यांचा जन्मदिन, चंदन तस्कर वीरप्पन चकमकीत ठार; आज इतिहासात

18 October In History : देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 18 ऑक्टोबर या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे. विजेचा बल्बसह अनेक शोध लावणारे संशोधक  थॉमस अल्वा एडिसन यांचा आज स्मृतीदिन आहे. त्याशिवाय अस्पृश्यांसाठी काम करणाऱ्या डिस्प्रेड क्लास मिशनचा आज स्थापना दिन आहे. अभिनेते ओम पुरी यांचा जन्मदिन ही आज आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरलेला चंदन आणि हस्तिदंताची तस्करी करणारा कुख्यात तस्कर वीरप्पन 18 ऑक्टोबर 2004 रोजी चकमकीत ठार झाला होता. वाचा सविस्तर 

[ad_2]

Related posts