Gold Silver Rate Today Are Surging Ahead Due To Ongoing War Between Israel And Hamas

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gold Silver rate : सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. आज पुन्हा सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसू शकते. गेल्या काही दिवसात सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात घसरण होत होती. मात्र, आता पुन्हा दरात वाढ होत आहे. वायदे बाजारात चांदीच्या दरात 700 रुपयांनी वाढ झाली आहे. इस्रायल-हमास युद्धाच्या तीव्रतेनंतर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या साधनांकडे वळत आहेत. त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत असल्याचे मानले जाते.

फ्युचर्स मार्केटमध्ये, MCX वर आज सोन्याच्या दरात 462 रुपयांची म्हणजेच 0.78 टक्क्यांची वाढ झाली आहे. आज सोने 59 हजार 680 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. तर आज एमसीएक्सवर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 703 रुपये म्हणजे 0.96 टक्क्यांच्या वाढी झाली आहे. आज चांदीचे दर हे 72 हजार 270 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. 

जाणून घेऊयात महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे दर

दिल्लीत – 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 540 रुपयांनी वाढून 60,640 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

मुंबईत – 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 540 रुपयांनी वाढून 60,490 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

कोलकातामध्ये –  24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 540 रुपयांनी वाढून 60,640 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

चेन्नईमध्ये – 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 550 रुपयांनी वाढून 60,710 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

अहमदाबादमध्ये – 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 540 रुपयांनी वाढून 60,540 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

बंगळुरूमध्ये – 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 540 रुपयांनी वाढून 60,690 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

हैदराबादमध्ये – 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 540 रुपयांनी वाढून 60,490 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

जयपूरमध्ये – 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 540 रुपयांनी वाढून 60,640 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

लखनौमध्ये – 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 540 रुपयांनी वाढून 60,640 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

पाटणामध्ये – 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 540 रुपयांनी वाढून 60,540 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

तुळजाभवानी मंदिरातील 200 किलो सोनं, चांदी वितळवण्यास RBI ची परवानगी, कसे वितळवणार सोनं?

[ad_2]

Related posts