[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Devendra Fadnavis Nagpur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नव्याने उभारण्यात येणार
नागपूरच्या अंबाझरी उद्यानाजवळ असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नव्याने उभारण्यात येणार आहे. खुद्द महाराष्ट्र शासन हे भवन उभारेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे… एवढेच नाही तर अंबाझरी पर्यटन विकास योजना देखील रद्द केली असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन नव्यानं उभारण्यात यावं यासाठी गेल्या २७२ दिवसांपासून अंबाझरीमध्ये आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला आज फडणवीसांनी भेट दिली, आणि त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे.
[ad_2]