Pune Crime News Arrested Illegal Migrant Is A Blast Case Accused In Bangladesh Pune Police Cops To Court

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हडपसरमधून 4 बांगलादेशींना (Bangladesh) अटक केली होती. त्यातील (Pune Crime News)  एक आरोपी हा बांगलादेशातील बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कमरूल मंडल असं या आरोपीचं नाव आहे. बेनापोल, बांगलादेश येथे हात बॉम्ब टाकले प्रकरणी त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर विनापरवाना भारतात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी पुण्यात बांगलादेशींना अटक करण्यात आली होती, यात हा कमरूल मंडल  होता, अशी माहिती हडपसर पोलिसांनी न्यायालयात दिली.

बांगलादेशी असलेल्या कमरूल मंडलला 15 ऑगस्ट 2021 रोजी अन्य सहा संशयित बांगलादेशी घुसखोरांसह हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी आपण बांगलादेशी आहोत हे संशयितांनी सांगितले, तशी स्टेशन डायरी नोंदही झाली परंतु विशेष तपास न करता पोलिसांनी सर्वांना सोडून दिले होते.   

पुन्हा Military Intelligence ने लक्ष घातल्यावर हडपसर पोलिसांनी मंडलसह बेकायदेशीर वास्तव्य करणारे 4 बांगलादेशी नागरिकांना 14 ऑक्टोबरला हडपसर अटक केली, तर एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल केला. तपासात त्यांना आधार, पॅन कार्ड सारखी भारतीय ओळखपत्र मिळवून देणारा पुण्यातील ‘एजंट’ पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी ‘एजंट’ कडूनही बांगलादेशी पासपोर्ट जप्त केले आहेत. 

अटक बांगलादेशी आरोपी पश्चिम बंगाल येथील बँक अकॉउंटद्वारे बांग्लादेशात पैसे पाठवत असल्याचे तपासात उघड झाले. अंतरराष्ट्रीय धागेदोरे असणाऱ्या रॅकेटचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी न्यालयात सांगितले. न्यायालयाने 5 अटक आरोपीना ऑक्टोबर 23 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी गुन्ह्याची माहिती घेतली असून तपासात लक्ष घातले आहे.

पुण्यात एवढ्या संख्येत बांगलादेशी कसे?

मागील काही दिवसांपासून पुण्यात बांगलादेशी नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक परिसरात अनेक बांगलादेशी नागरिक राहत असल्याचं समोर आलं होतं. त्यातच आता पुणे पोलीस बांगलादेशी नागरिकांबाबतीत अॅक्टिव्ह मोडवर आल्याचं बघायला मिळालं आहे. बांग्लादेशी महिना आणि पुरुषांवर पोलिसांनी करडी नजर ठेवल्याचं दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. विशेष मोहिमेंतर्गत 19 बांगलादेशींना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. यात 10 महिला आणि 9 पुरुषांचा समावेश होता.

इतर महत्वाची बातमी-

Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोणाला सोडणार नाही; तपासानंतर अनेकांचे तोंडं बंद होतील; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांचा निशाणा

[ad_2]

Related posts