[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन माध्यमातून हजेरी लावली होती. तर कौशल्य विकास प्रशिक्षण हे तरुणांच्या जीवनात नवी पहाट आणेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील 350 तालुक्यांमध्ये एकूण 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
सह्याद्री अतिथीगृहावर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उद्योगमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. तसेच राज्यातील ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी देखील उपस्थिती होते. संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वरिष्ठाधिकारी, केंद्रांचे समन्वयक तसेच प्रशिक्षणार्थी उमेदवार, नागरिक मोठ्या संख्येने ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं ?
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, युवकांसाठी प्रशिक्षण आणि संधीच्या दृष्टीने ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. या प्रशिक्षणामुळे युवकांच्या जीवनात नवी पहाट येईल. कारण जगभरात भारतातील प्रशिक्षित तरुणांना मागणी आहे. अन्य देशांमध्ये अनुभवी लोकांची संख्या वाढत आहे. एका र्व्हेक्षणानुसार जगभरातील 16 देशांमध्ये 40 लाख प्रशिक्षित युवकांची गरज असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अशा युवकांना या देशांमध्ये बांधकाम, आरोग्य, पर्यटन, शिक्षण आणि परिवहन अशा क्षेत्रात मोठी मागणी आहे. त्यासाठी हे कौशल्य विकास प्रशिक्षण त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण केवळ भारतासाठी नाहीतर, अशा देशांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करू शकतो.
तर यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या औद्योगिकरणाबाबतच्या विचारांचा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा देखील उल्लेख केला. यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, कौशल्य विकास आणि अशा प्रक्षिणातूनच दलित, वंचित आणि मागास घटकांना अधिक प्रतिष्ठापुर्वक, सन्मानाने जगण्याची संधी मिळते. त्यामुळे याच घटकांना या कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. आता ड्रोनद्वारेही आधुनिक शेती करता येते. यामुळे आपल्या महिलांना देखील संधी मिळेल. त्यांनाही या क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात येईल.
काय आहे ही योजना ?
राज्यातील 350 तालुक्यांमधील 511 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामीण भागातील तरुणांना आणि उद्योजकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामाध्यमातून पारंपारिक आणि व्यावसायिक कौशल्य क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात येईल. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी ही विकास केंद्रे उपयुक्त ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या केंद्रामध्ये एकावेळेस जास्तीत जास्त 2 जॉब-रोल्सचे प्रशिक्षण प्रदान करण्यात येईल. साधारण तीन महिन्यांमध्ये किमान 200 ते 600 तास प्रशिक्षण देण्यात येईल. अभ्यासक्रमाची निवड जिल्हा, कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत करण्यात येईल. तसेच वर्षभराच्य कालावधीमध्ये 100 उमेदवारांच्या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल.
हेही वाचा :
Cabinet Meeting Decision : बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत या योजनांमध्ये एकसमानता आणणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
[ad_2]