Kisan Credit Card News Kcc Saturation Drive Kcc Card Made 14 Day

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

KCC Card : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. याशिवाय शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्जही उपलब्ध करुन देत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड (KCC) असणे आवश्यक आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी मिशन मोड अंतर्गत मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेला KCC सॅच्युरेशन ड्राइव्ह असे नाव देण्यात आले आहे. म्हणजेच आता पात्र शेतकरी KCC बनवून स्वस्त दरात कर्ज मिळवू शकतात.

आता फक्त 14 दिवसात किसान क्रेजीट कार्ड मिळणार आहे. ह कार्ड काढण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची वेळ आहे. KCC अंतर्गत पीएम किसान लाभार्थ्यांच्या कव्हरेजसाठी सीसी सॅचुरेशन ड्राइव्ह मोहीम सुरू करण्यात आली आहे. पीएम किसानच्या सर्व लाभार्थ्यांना KCC अंतर्गत कर्ज मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

KCC कार्ड म्हणजे काय?

केसीसी ही केंद्र सरकारची विशेष योजना आहे. याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या नावावर केसीसी कार्ड बनवले जाते. या कार्डवर शेतकरी स्वस्त दरात कमाल 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. यासाठी शेतकरी बांधवांना चार टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास त्यांना तीन टक्के अनुदान मिळते. त्याच वेळी, एक शेतकरी KCC वर 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहजपणे मिळवू शकतो. यासाठी शेतकऱ्याला तारण भरावे लागत नाही.

बँक 14 नोव्हेंबरपर्यंत कार्ड बनवून देणार

शेतकरी बांधवांना पशुपालन, मत्स्यपालन किंवा शेतीशी संबंधित कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते KCC कडून कर्ज घेऊ शकतात. हे अल्प मुदतीचे कर्ज आहे. शेतकरी बांधवाची सर्व कागदपत्रे बरोबर आढळल्यास, बँकेला अवघ्या 14 दिवसांत कार्ड जारी करावे लागेल. मात्र, केंद्र सरकारची केसीसी सॅच्युरेशन ड्राइव्ह मोहीम या महिन्याच्या 1 तारखेपासून सुरू झाली असून संपूर्ण महिनाभर सुरू राहणार आहे. याचा अर्थ शेतकरी बांधवांना 31 ऑक्टोबरपर्यंत केसीसी करून घेण्याची संधी आहे. शेतकरी बांधवांनी 31 ऑक्‍टोबर रोजीही मोहिमेअंतर्गत केसीसी बनवण्‍यासाठी कागदपत्रे जमा केली तर बँक कार्ड बनवून 14 नोव्‍हेंबरपर्यंत देतील.

तुम्हाला फक्त 2 लाख रुपयांचे कर्ज मिळेल

खरं तर, KCC अंतर्गत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनासाठी व्याजावर सवलत मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र मत्स्यपालन आणि पशुसंवर्धनासाठी तीन लाखांऐवजी केवळ दोन लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. जर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड 14 दिवसांच्या आत बनवायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी लवकर अर्ज करावा लागेल. अर्ज करताना बँक तुमच्याकडून फक्त कागदपत्रे मागवेल. प्रथम, शेतीची कागदपत्रे, दुसरे, रहिवासी प्रमाणपत्र आणि तिसरे, अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र. विशेष म्हणजे अर्ज करताना फक्त एक पानाचा फॉर्म भरावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture news : मोठी बातमी! मोदी सरकारचं शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, सहा पिकांच्या MSP मध्ये वाढ  

[ad_2]

Related posts