[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सोलापूर: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सल्ले ऐकण्याच्या पलीकडे गेलेत त्यापेक्षा ऐकणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आम्ही सल्ले देऊ ते ऐकतात तरी आणि उद्धव ठाकरे याना जवळच्या चांडाळ चौकडीचा किती ऐकायचे हे समाजात नसेल तर त्यांनी राजकारणात येऊन राज्याची वाट लावू नये अशा शब्दात हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई (Dhananjay Desai) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. पंढरपूर (Pandharpur) येथे हिंदू महासभेच्यावतीने देसाई याना क्रांतिवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी ते बोलत होते .
ज्या पद्धतीने राज्यात एकनाथ शिंदे यांनी कामाची वाटचाल सुरु केली ती उद्धव ठाकरे यांच्या काळात दिसली नाही असे सांगितले. नवाब मलिक यांनी दाऊदची संपत्ती सांभाळण्याचे काम केले त्यांना अटकेनंतरही मंत्रिपदावर ठेवणारी राज्यसत्ता आम्हाला नको आहे असा टोला लगावला.
याकूब मेनन याला फाशी देऊ नये म्हणून पालकमंत्र्यांनी कोर्टाला जागवले
असलम शेख मुंबईचे पालकमंत्री होते ज्यांनी याकूब मेनन याला फाशी देऊ नये यासाठी राष्ट्रपतींना रात्रभर निवेदने देऊन सुप्रीम कोर्टाला रात्रभर जागवणारा पालकमंत्री देणारा मुख्यमंत्री आम्हाला नको आहे असाही टोला लगावला . त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे यांचीच राज्यसत्ता टिकावी आणि ती बलवान व्हावी आणि अशाच विचाराची राज्यसत्ता महाराष्ट्राला गरजेची असल्याचे देसाई यांनी सांगितले .
मोदींवर टीका करणारी लोकं भामटी आहेत
इस्त्रायल आणि पॅलेस्टिन (Israel Hamas War Updates) युद्धात ज्या हमासने महिलांवर क्रूर अत्याचार केले , ज्यांची नग्न धिंड काढली त्यांच्या समर्थनार्थ भारतात निदर्शने करणारी काही नीच लोक ही भारताची विटंबना असल्याचा घणाघात त्यांनी केला. मणिपूरचे सत्य जाणून घ्यावे लागेल असे सांगत मणिपूरचे उदाहरण देऊन मोदींवर टीका करणारी लोकं भामटी आहेत , तिथे ख्रिश्चन धर्मांतरण होऊन भारत विरोधी चळवळी राबविल्या जात आहेत असे देसाई यांनी सांगितले,
हे ही वाचा:
Nagpur : फडणवीसांनी दोन-दोन पक्ष फोडले, तरीही मुख्यमंत्रीपद नशिबात नाही, पुढेही होणार नाहीत; सुषमा अंधारेंचा नागपुरातून आरोप
[ad_2]