IMD Weather Update Today 21 October 2023 Kerala Delhi Ncr Punjab Haryana Uttar Pradesh Imd Forecast Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IMD Weather Update Today : पावसाळ्यानंतर (Rainy Season) देशातील अनेक भागांत थंडीला सुरुवात झाली आहे. तसेच, दक्षिण आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अजूनही पाऊस सुरूच आहे. राजधानी दिल्लीत (Delhi) पुढील दोन दिवस हलके धुके राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. IMD नुसार, केरळमध्ये 23 आणि 24 ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मिझोराम, नागालँड आणि मणिपूरमध्ये 24 ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाने (IMD Weather Update) दिलेल्या माहितीनुसार, आज (21 ऑक्टोबर) रोजी दिल्लीत कमाल तापमान 31 अंश आणि किमान तापमान 16 अंश राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पारा आणखी घसरणार आहे. शुक्रवारी दिल्ली-एनसीआरचे किमान तापमान 16 अंशांवर नोंदवले गेले आहे, जे सामान्य तापमानापेक्षा दोन अंश कमी आहे. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) बद्दल बोलायचे तर, शुक्रवारी सकाळी AQI 260 ची नोंद झाली.

…तर हवेची गुणवत्ता चांगली आहे

हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, जर AQI शून्य ते 50 च्या दरम्यान असेल तर याचा अर्थ हवेची गुणवत्ता चांगली आहे. पण, जर ती 50 ते 100 च्या दरम्यान असेल तर आपण त्याला समाधानकारक म्हणू शकतो. याशिवाय 101 ते 200 मध्यम श्रेणीत आणि 201 ते 300 दरम्यान वाईट श्रेणीत येतात. 301 ते 400 दरम्यानची स्थिती वाईट मानली जाते, तर 401 ते 500 मधील हवेची गुणवत्ता गंभीर मानली जाते.  

आज हवामान कसे असेल? 

याशिवाय आज राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता असून, त्यानंतर हळूहळू थंडी वाढेल. उत्तर प्रदेशातही हळूहळू हवामान बदलू लागले आहे. येथे दिवसा हवामान सामान्य राहते, परंतु सकाळी हलकीशी थंडी पडू लागली आहे. हवामान खात्यानुसार, आज 21 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील. यासोबतच केरळ आणि लक्षद्वीपमध्ये आज हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि किनारी आंध्र प्रदेश, किनारी कर्नाटक, तामिळनाडू, सिक्कीम आणि ईशान्य भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय 101 ते 200 मध्यम श्रेणीत आणि 201 ते 300 दरम्यान वाईट श्रेणीत येतात. 301 ते 400 दरम्यानची स्थिती वाईट मानली जाते, तर 401 ते 500 मधील हवेची गुणवत्ता गंभीर मानली जाते. यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याची गरज सरकारकडून सांगण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Gaganyaan Mission: लॉन्चिंगच्या 5 सेकंदापूर्वीच रोखलं गगनयानचं चाचणी उड्डाण; खराब हवामानामुळे प्रक्षेपण पुढे ढकललं

[ad_2]

Related posts