Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning 21st October 2023 Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

Gaganyaan Mission: लॉन्चिंगच्या 5 सेकंदापूर्वीच रोखलं गगनयानचं चाचणी उड्डाण; खराब हवामानामुळे प्रक्षेपण पुढे ढकललं

Gaganyaan Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज गगनयान (ISRO Gaganyaan) मोहिमेचं पहिलं चाचणी उड्डाण प्रक्षेपित करणार नाही. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ (S. Somanath) यांनी सांगितलं की, आज प्रक्षेपित होणारी मोहीम खराब हवामानामुळे स्थगित करण्यात आली आहे. लवकरच या चाचणीचं पुन्हा प्रक्षेपण केलं जाईल. वाचा सविस्तर 

अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ‘अबॉर्ट टेस्ट’, जाणून घ्या क्रू एस्केप सिस्टम आहे तरी काय? 

Gaganyaan Mission Test Flight Today: इस्रोच्या (Indian Space Research Organisation) गगनयान मोहिमेअंतर्गत (Gaganyaan Mission) आज पहिलं चाचणी उड्डाण प्रक्षेपित केलं जाणार आहे. गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. ही चाचणी आज सकाळी आठ वाजता श्रीहरीकोटा (Sriharikota) इथे पार पडेल. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल. इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे. वाचा सविस्तर 

MH CET 2024 Updates: महाराष्ट्र CET परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 16 एप्रिल ते 2 मे दरम्यान परीक्षा

MH CET 2024 Updates: सीईटीच्या परीक्षेचं (CET Exams) वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा (MH CET 2024 Updates) 16 एप्रिल ते 2 मे या कालावधीत होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटी ही सीईटी सेलतर्फे घेण्यात येते. त्यामुळे वेळापत्रक जाहीर झाल्यानं आता विद्यार्थीही परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. वाचा सविस्तर 

Sanjay Pandey Meet Uddhav Thackeray: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, कारण गुलदस्त्यात

Sanjay Pande Meet Uddhav Thackeray: मुंबईचे (Mumbai News) माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. दोघांमधील भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी ठाकरेंची भेट घेतली. पांडे आणि ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना मोठं उधाण आलं आहे. वाचा सविस्तर 

Points Table : पाकिस्तान टॉप 4 मधून बाहेर, ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर गुणतालिकेत उटलफेर

World Cup 2023 Points Table : ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव करून विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शची शतकं, तसंच त्यांनी 259 धावांची दिलेली सलामी ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक ठरली. विश्वचषकाच्या साखळीत ऑस्ट्रेलियाचा हा दुसरा विजय, तर पाकिस्तानचा दुसरा पराभव ठरला. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 368 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. पाकिस्ताननं त्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा डाव 305 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झॅम्पानं चार, तर पॅट कमिन्स आणि मार्कस स्टॉयनिसनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी, ऑस्ट्रेलियाच्या डावात डेव्हिड वॉर्नरनं 163 आणि मिचेल मार्शनं 121 धावांची खेळी उभारली. वाचा सविस्तर 

वर्ल्ड कप दरम्यान नवा वाद? ‘पाकिस्तान जिंदाबाद म्हणू नका!’, चाहत्यांना पोलिसांनी रोखलं, व्हायरल व्हिडीओनं लक्ष वेधलं

Pakistan Zindabad Controversy:  वर्ल्ड कप 2023 ( World Cup 2023) च्या सामन्यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता  वर्ल्ड कप 2023 च्या दरम्यान एक नवा वाद निर्माण झाला आहे. बेंगळुरू (Bengaluru) येथे झालेल्या पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australian) या सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहत्यांना “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा देण्यापासून रोखलं गेलं. वाचा सविस्तर 

21 October In History : अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म , सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना; आज इतिहासात

22 ऑक्टोबर हा दिवस इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्याच दिवशी 1943 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. 22 ऑक्टोबर रोजी अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म झाला होता. अल्लाउद्दिन खिलजीने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली होती. Hit And Run प्रकरणी मुंबई पोलिसांनी सलमान खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 18 ऑक्टोबर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा केली. त्याशिवाय आज अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यातिथी आहे. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर 

Horoscope Today 21 October 2023 : मेष, सिंह, कन्या, धनु राशीच्या लोकांनी ‘हे’ काम करू नये, 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 October 2023 : आज 21 ऑक्टोबर 2023, राशीभविष्यानुसार, आजचा शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार कर्क राशीच्या राशीच्या राशीच्या लोकांना चांगला नफा मिळेल आणि तुमचे मन खूप आनंदी राहील. इतर राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या… वाचा सविस्तर 

[ad_2]

Related posts