Job Scam Viral Post Scammer Wanted To Trap By Promising Job Man Had Fun With Him

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Job Scam: आजकाल नोकरीचं आमिष (Job Scam) दाखवून लोकांना फसवणाऱ्या घोटाळेबाजांची संख्या वाढत आहे. पैसे कमवण्यासाठी घोटाळेबाज विविध युक्त्या वापरतात. कधी-कधी लोकांच्या बँक खात्यातून फसवणूक करून पैसे काढले जातात. विशेष म्हणजे हे घोटाळेबाज इतके चतुर असतात की त्यांच्याकडे कॉल करणाऱ्याची संपूर्ण माहिती असते. हे घोटाळेबाज मुलींच्या नावाने विविध व्यक्तींशी संवाद साधतात आणि त्यांना जॉब ऑफर करतात, ज्यासाठी पुढे त्यांच्याकडून पगारासाठी बँक खात्याचा नंबर (Bank Account Number) मागितला जातो.

आता असाच एक नोकरीसाठीचा मेसेज (Job Offer) एका व्यक्तीला आला आणि त्या मेसेजला बळी न पडता त्या व्यक्तीने दिलेलं उत्तर इतकं भन्नाट होतं की, अनेकजण वाचून त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देऊ लागले. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

नेमकं घडलं काय?

त्याचं झालं असं की, नोकरीचं आमिष दाखवून लुटणाऱ्या घोटाळेबाजाने एका व्यक्तीला मुलगी असल्याचं भासवून मेसेज केला. नोकरीची संधी उपलब्ध करुन देणारा हा फसवणुकीचा मेसेज होता, जो समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आला. आता हा व्यक्ती त्या घोटाळेबाजाची मज्जा घेऊ लागला आणि आपल्याला नोकरीची गरज नसून प्रेमाची गरज असल्याचं सांगू लागला. मला प्रेम मिळेल का? असं विचारल्याबरोबर त्या घोटाळेबाजाचंही डोकं फिरलं आणि यावर त्याने तसंच प्रत्युत्तर दिलं. या चॅट्सचे स्क्रिनशॉट त्या व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

घोटाळेबाजाने नेमका काय मेसेज केला?

या पोस्टमध्ये घोटाळेबाज मुलगी (लावण्या) असल्याचं भासवून त्या माणसाशी बोलत आहे. ती त्या माणसाला विचारते की, त्याला नोकरीची गरज आहे का? समोरच्या व्यक्तीने बोलणं टाळलं तरी ती मुलगी त्याला कामाबद्दल वारंवार सांगते, यानंतर मात्र तो माणूस तिच्याशी फ्लर्ट करू लागतो, तिच्याकडे प्रेमाची मागणी करू लागतो. तो मुलीला सांगतो की त्याच्या आयुष्यात पैशाची कमतरता नाही, पण त्याला तिच्या प्रेमाची गरज आहे. 

यानंतर मुलगी आमच्याकडे अशी सुविधा पुरवली जात नसल्याचं सांगते, तरीही ही व्यक्ती घोटाळेबाजाशी प्रेमाबद्दल बोलणं सुरुच ठेवते. शेवची घोटाळेबाज त्या व्यक्तीच्या मेसेजला प्रतिसाद देत नाही. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.यावर अनेक लोक मजेशीर प्रतिक्रिया देखील देत आहेत.

पोस्ट बघून लोकांना हसू आवरेना

व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. ही पोस्ट बघून लोकांना हसू आवरेनासं झालं आहे. त्या व्यक्तीने स्कॅमरशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट ट्विट करून शेअर केला आहे. या पोस्टवर एका नेटकऱ्याने म्हटलं की, ‘घोटाळे करणाऱ्याचा स्वतःचाच घोटाळा झाला.’ दुसऱ्या एकाने म्हटलं की, ‘हे वाचून खूपच मजा आली.’

हेही वाचा:

LGBTQIA मधील L चा अर्थ आहे लेस्बियन आणि G चा अर्थ गे; मग BTQIA चा अर्थ काय?

 



[ad_2]

Related posts