Diwali Special Candle Making Business Ideas In Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Best Business Ideas In Marathi : भारतीय परंपरेनुसार दिवाळीला एक वेगळंच महत्त्व आहे. दिवाळी म्हटलं की, महिला मंडळींची शॉपिंग खरेदी आलीच. दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हटला जातो. त्यामुळे पणत्या, आकाशकंदील, मेणबत्त्या आणि रांगोळी आलीच. दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या बाजारपेठांमध्ये दिसतात. त्यात सर्वात विकली जाणारी पणती म्हणजे मेणबत्त्यांची पणती. त्यामध्ये पणतीच्या आकारात मेनबत्ती तयार केली जाते. त्यामुळे पणतीमध्ये वात लावणे आणि सारखं तेल ओतण्याची भानगड नाही. यामध्ये तुम्ही व्यवसायाची संधी शोधू शकता. कमी भांडवलात तुम्ही एक उत्तम पैसे कमावून देणारा धंदा सुरू करू शकता. 

बर्थडे पार्टी असो वा दिवाळी… या निमित्ताने घर उजळून टाकण्यासाठी रंगीबेरंगी मेणबत्त्यांचा वापर गेल्या काही वर्षांत झपाट्यानं वाढला आहे. रंगीबेरंगी मेणबत्त्या बनवून तुम्ही चांगलं उत्पन्न मिळवू शकता. हा व्यवसाय करण्यासाठी जास्त लाखभर रुपयांची गरज नसते. तुम्ही कमी भांडवलात देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. त्याचबरोबर हा व्यवसाय करण्यासाठी मोठ्या जागेची देखील गरज नाही. तुमच्या घरी देखील तुम्हाला हा बिझनेस सुरू करता येतो. यासाठी महागडे मशिन बसवण्याची गरज नाही, याशिवाय साहित्य सर्वत्र सहज उपलब्ध आहे. 

मेणबत्त्या तयार करण्यासाठी आपण सुरुवातीला मूस वापरू शकता. ज्यामध्ये तुम्ही मेण टाकून मेणबत्ती बनवू शकता. त्यात  मेण, धागा, रंग आणि इथर ऑइलचा वापर केला जातो. तुम्ही घरगुती वस्तूंचा वापर करून स्वस्तात व्यवसाय सुरू करा. त्यानंतर मागणी वाढली की तुम्ही स्वयंचलित मशीन खरेदी करू शकता. याची किंमत 35,000 रुपये आहे. मॅन्युअल मशीनने तुम्ही दर तासाला 1800 मेणबत्त्या बनवू शकता. 

मार्केटिंग कशी करायची?

कोणतंही प्रोडक्ट विकण्यासाठी मार्केटिंगची गरज आहे. सुरूवातीला तुमचा बिझनेस लिमिटेड असल्यामुळे तुम्ही दुकानात जाऊन तुमच्या प्रोडक्टची माहिती देऊन ऑर्डर घेऊ शकता. दिवाळी आहे म्हटल्यावर तुमचा खप शहरातील प्रमुख मार्केटमधून जास्त होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या शहरातील प्रमुख मार्केट शोधा आणि ग्राहक निर्माण करा. त्याचबरोबर तुम्ही आधुनिक पद्धतीने ई-कॉमर्स वेबसाइटवर देखील तुमचं प्रोडक्ट विकू शकता. यावेळी तुम्हाला ऑफर द्यावी लागेल, तरच तुम्हाला ग्राहक मिळतील. 

आणखी वाचा – Business Ideas : रेल्वे स्टेशनवर दुकान टाकायचंय? जाणून घ्या साधी सोपी प्रक्रिया अन् भाडं

दरम्यान, सुरूवातीला तुम्ही लाख कमावण्याच्या नादाला लागू नका. पहिला खप किती होती. त्यानुसार मार्केटिंग वाढवा. सुरूवातीला तुम्हाला 20 हजारपर्यंत फायदा होईल. मात्र, मागणी वाढली की पुरवठा कमी होणार नाही, याची खातरजमा देखील करावी लागेल. 

Related posts