Dashanan Temple Kanpur Dasara 2023 Uttar Pradesh Ravan Pooja In Kanpur Temple On Vijayadashami

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dashanan Temple Kanpur: एकीकडे आज विजयादशमीनिमित्त (Vijayadashami) देशभरात रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जाणार आहे. तर दुसरीकडे देशात अशीही काही ठिकाणं आहेत जिथे रावणाची मनोभावे पूजा केली जाते. आज रावणाच्या पूजेची परंपरा असलेल्या अशाच काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊया, जिथे लोक लंकेश्‍वर रावणाची पूजा करतात आणि त्याच्याकडे आपली इच्छा मागतात. वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमीचा सण साजरा केला जातो.

वर्षातून एकदा उघडलं जातं मंदिर

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील शिवाला येथे दशानन मंदिर आहे. हे रावणाचं मंदिर असून दसऱ्याच्या दिवशी पहाटेपासूनच भाविक रावणाची पूजा करण्यासाठी तिथे पोहोचतात. हे मंदिर शेकडो वर्षं जुनं आहे आणि विशेष म्हणजे हे मंदिर एकदाच उघडलं जातं. हे मंदिर विजयादशमीच्या दिवशीच उघडलं जातं

रावणाला मानणारे दसऱ्याच्या दिवशी पहाटेपासून येथे पोहोचतात आणि पूजा सुरू करतात. दशानन मंदिरात शक्तीचं प्रतीक म्हणून रावणाची पूजा केली जाते. विजयादशमीच्या दिवशी सकाळी आठ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जातात आणि रावणाच्या मूर्तीची सजावट करण्यात येते, आजही सकाळी 8 वाजता रावणाच्या मंदिरात पूजा करण्यात आली आहे, यानंतर आरती देखील झाली. या मंदिराची स्थापना 1890 मध्ये गुरु प्रसाद शुक्ल यांनी केली होती.

रावणाच्या बुद्धीची केली जाते पूजा – पुजारी

दशानन मंदिराचे पुजारी राम बाजपेयी म्हणाले की, आम्ही दसऱ्याच्या दिवशी हे मंदिर उघडतो आणि दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा करतो आणि त्यानंतर संध्याकाळी पुतळा दहन केल्यानंतर आम्ही हे मंदिर बंद करतो. हे मंदिर फक्त दसऱ्याच्या दिवशी उघडतं, रावणाच्या ज्ञानासाठी आम्ही त्याची पूजा करतो.

भगवान श्रीरामांनी लक्ष्मणाला ज्ञान प्राप्तीसाठी रावणाकडे पाठवलं होतं. यामुळेच दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या मंदिराचे दरवाजे उघडले जातात आणि शक्ती, बुद्धिमत्ता, दीर्घायुष्य आणि आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठी लोक कानपूरमधील रावणाच्या मंदिरात जमतात.

सकाळी पूजा, संध्याकाळी दहन

पुजाऱ्यांनी म्हटलं की, आम्ही रावणाच्या बुद्धीची पूजा करतो. ते म्हणाले, रावणाइतका विद्वान, ज्ञानी, पराक्रमी आणि बलवान कोणीही नाही. रावणात फक्त एक दोष होता, अहंकार होता आणि त्यामुळे त्याचा पुतळा जाळला जातो. संध्याकाळी कानपूरमध्ये रावणाच्या पुतळ्याचं दहन करून अहंकार नष्ट केला जातो.

हेही वाचा:

Dasara 2023: दसऱ्याच्या दिवशी करा ‘हे’ उपाय; आर्थिक समस्या होतील दूर, समृद्धीही नांदेल

[ad_2]

Related posts