Swapana Shastra: तुम्हाला दुधाशी संबंधित स्वप्नं पडतात का? चुकूनही करु नका दुर्लक्ष; यामागे दडलाय मोठा अर्थ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Meaning of Seeing Milk in Dreams: रात्री झोपल्यानंतर स्वप्न पडणं तशी सामान्य गोष्ट आहे. अनेकदा स्वप्नात आपल्याला आपले कुटुंबीय, मित्र किंवा काही अनपेक्षित, भीतीदायक गोष्टीही दिसत असतात. किंवा दिवसभरातील एखादी घटनाही स्वप्नात येत असते. काही वेळा स्वप्नात अचानक एखादी अनपेक्षित व्यक्ती दिसल्यानेही आपल्याला आश्चर्य वाटतं. सकाळी उठल्यानंतर आपण हे स्वप्न का पडलं असावं असा विचार करतो. पण त्यामागील अर्थ सापडत नाही. पण धार्मिक विद्वानांनी स्वप्नशास्त्रात या स्वप्नांमागील रहस्य उलडगलं आहे. असंच एक स्वप्न म्हणजे, स्वप्नात वारंवार दूध दिसणं. याचा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊयात…

स्वप्नात दूध उकळताना दिसणं

जर तुम्हाला स्वप्नात दूध उकळताना दिसत असेल तर मग हे सुखी भविष्याचे संकेत आहेत. स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ, करिअरमध्ये तुमची फार लवकर प्रगती होणार आहे. तुम्ही जेवढे कष्ट घेतले आहेत, त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तसंच तुमची अडकलेली सर्व कामं पूर्ण होतील. 

फाटलेलं दूध दिसणं

स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात दूध फाटताना दिसत असेल तर याचा अर्थ लवकरच तुमच्यावर एखादं संकट ओढावण्याची शक्यता आहे. हे स्वप्न तुम्हाला संकेत देतं की, भविष्यात कोणताही निर्णय घेताना पूर्णपणे विचार करु घ्या आणि तो घेताना अजिबात करु नका. 

दूध सांडताना दिसणं

जर तुम्हाला स्वप्नात दूध भांड्यातून सांडताना दिसत असेल तर तो अशुभ संकेत असतो. याचा अर्थ भविष्यात लवकरच तुमच्यावर एखादा वाईट प्रसंग ओढावणार आहे. अशा स्थितीत तुम्ही शांत राहणं आणि पूजा पाठ करत देवाला प्रसन्न करण्याची गरज आहे. 

दुधात साखर मिसळणे

अनेकदा आपल्याला स्वप्नात दुधात साखर मिसळताना दिसतं. स्वप्नाशास्त्रानुसार, अशा प्रकारचं स्वप्न दिसणं सुखी भविष्याचा संकेत असतो. याचा अर्थ तुम्ही ज्या गोष्टीवर काम करत आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. तसंच तुमच्या नशिबाची दारं उघडली जाणार आहेत. 

स्वप्नात दूध पिताना दिसणं

जर तुम्हाला स्वप्नात तुम्ही स्वत: दूध पिताना दिसत असाल तर तुमची आता प्रगतीच्या मार्गावर वाटचाल सुरु होणार, त्या अजून रुंदावणार आहेत हे समजून घ्या. स्वप्नशास्त्रानुसार, असं स्वप्न दिसण्याचा अर्थ तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार असून तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोतही वाढणार आहेत. तसंच तुमच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचे ते संकेत असतात. 

 

Related posts