META Caused Of Depression children American states protested filed petition;’इंस्टाग्राममुळे तरुणांमध्ये वाढतेय डिप्रेशन’ अनेक राज्यांची एकत्र META विरोधात याचिका

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Petition agianst META:  सध्याच्या तरुणांचा वेळ मैदानी खेळ खेळण्याऐवजी फेसबुक, इंस्टाग्राम अशा मेटा प्लॅटफॉर्मवर जास्त जातोय.भारतासह जगभरातील पालकांची ही तक्रार आहे. यामुळे बहुतांश पालक चिंतेमध्ये असतात. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेचाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण तरुण लोक डिप्रेशनमध्ये जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी एकत्र येत मेटा प्लॅटफॉर्म विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांतील पालकांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.

मेटा प्लॅटफॉर्म आणि त्याचे इंस्टाग्राम तरुणांसाठी व्यसन बनले असून मानसिक आरोग्याच्या संकटाला खतपाणी घालत असल्याचा ठपका पालकांनी ठेवला आहे. यासंदर्भात अमेरिकेतील पालकांनी 24 ऑक्टोबर याचिका दाखल केली. 

मेटा वारंवार आपल्या प्लॅटफॉर्मच्या धोक्यांबद्दल जनतेची दिशाभूल करते. त्यामुळे जाणूनबुजून लहान मुले आणि किशोरवयीनांना व्यसनाच्या आहारी ओढले जाते. आता त्यांना सोशल मीडियाचा वापर करणे भाग पडले आहे, असे निरीक्षण यावेळी कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कसह 33 राज्यांतील अॅटर्नी जनरल यांनी नोंदवले. 

‘इन्स्टाग्राम किशोरांना व्यसनाधीन करतंय’

ऑकलंड, कॅलिफोर्नियाच्या फेडरल कोर्टात दाखल तक्रार दाखल करण्यात आले आहे. ‘मेटाने तरुण आणि किशोरवयीनांना आमिष दाखवण्यासाठी, फसवण्यासाठी आणि व्यसनाधीन करण्यासाठी शक्तिशाली आणि अभूतपूर्व तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामागे नफा मिळवणे हा त्यांचा उद्देश आहे, असे राज्यांचे म्हणणे आहे.

‘META मुळे मुलांमध्ये नैराश्य वाढते’

यूएस राज्यांनी न्यायालयाला सांगितले की, ‘मुले अनेक वर्षापासून इंस्टाग्राम, फेसबुकचे युजर्स आहेत. या वयात त्यांना आकर्षित केले जात आहे. लहान मुले ब्रँडशी अधिक निष्ठावान असू शकतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे मुलांना नैराश्य, चिंता, निद्रानाश यासारख्या नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर आणि दैनंदिन जीवनावरही होत असल्याचेही पुढे सांगण्यात आले. 

मेटाविरुद्ध 42 गुन्हे दाखल

आठ इतर यूएस राज्ये आणि वॉशिंग्टन, डीसी यांनी मंगळवारी मेटाविरूद्ध समान खटले दाखल केले. अशा एकूण 42 तक्रारी मेटाविरोधात दाखल झाल्या आहेत.

Related posts