Weather Update Marathi News Imd Weather Prediction 26 October 2023 Know Weather Alert

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IMD Weather Prediction of 26 October 2023 : बंगालच्या उपसागरात बांगलादेशजवळ सक्रिय असलेले चक्रीवादळ ‘हामून’ धोकादायक बनले आहे. त्याच्या प्रभावामुळे आज देशातील 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटनंतर आता तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होत असल्याचे दिसून येत आहे. तर लवकरच राज्यात थंडीची चाहूल लागण्याची चिन्हे आहेत.

 

आज 5 राज्यांत अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याने चक्रीवादळ ‘हमुन’ बाबत ताजे अपडेट जारी केले आहे. पुढील 12 तासांत त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने लोकांना वादळाबद्दल अपडेट राहण्यास तसेच शासनाच्या अधिकृत सल्ल्याचे पालन करण्यास सांगितले आहे. यासोबतच संबंधित राज्य सरकारांना वादळाच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदतकार्यासाठी पथके तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

 

चक्रीवादळ ‘हामून’ उत्तर-पूर्वेकडे सरकले 

खाजगी हवामान वेबसाईट स्कायमेटनुसार, तीव्र चक्रीवादळ ‘हॅमून’ आता उत्तर-पूर्वेकडे सरकले आहे. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी या चक्रीवादळाने चितगावच्या दक्षिणेला बांगलादेश किनारा ओलांडला होता. त्याचा वाऱ्याचा वेग ताशी 75 ते 85 किमी दरम्यान राहील. सध्या हे वादळ कमकुवत होऊन खोल दबावात रूपांतरित झाले आहे. हे वादळ आज कमकुवत होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याच बरोबर आणखी एक समान चक्रीवादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरावर समुद्रसपाटीपासून 1.5 ते 3.1 किमी उंचीवर असल्याचं देखील हवामान खात्याने म्हटंलय

देशातील गेल्या 24 तासांचे हवामान

देशातील गेल्या 24 तासांच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले, तर लक्षद्वीप, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्ये हलका पाऊस झाला. या काळात केरळमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर अंदमान आणि निकोबार बेटे आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

आज या ठिकाणी पाऊस पडू शकतो, थंडीचा जोर आणखी वाढणार

एजन्सीच्या मते, आज (उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारताच्या किमान तापमानात किंचित घट होऊ शकते. त्यामुळे रात्री थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. ईशान्य भारत, गंगेचा पश्चिम बंगाल, किनारी ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता आहे. यासोबतच केरळमध्ये येत्या 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

इतर शहरात आजचे हवामान कसे राहील? जाणून घ्या

देशाची राजधानी दिल्लीत आकाश निरभ्र राहील. आजचे तापमान किमान 17 ते कमाल 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत आकाश निरभ्र राहील. आजचे तापमान किमान 24 आणि कमाल 35 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

चेन्नईत आकाश निरभ्र असेल. आजचे तापमान किमान 26 आणि कमाल 33 अंश सेल्सिअस राहील.

कोलकात्यात आकाश निरभ्र असेल. आजचे तापमान किमान 25 ते कमाल 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असू शकते.

लखनौमध्ये आकाश निरभ्र असेल. आजचे तापमान किमान 18 ते कमाल 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

पाटण्यात आकाश निरभ्र असेल. किमान तापमान 20 ते कमाल 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

जयपूरमध्ये आकाश निरभ्र असेल. आजचे तापमान किमान 19 ते कमाल 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

भोपाळमध्ये आकाश निरभ्र असेल. आजचे तापमान किमान 17 आणि कमाल 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

चंदीगडमध्ये आकाश निरभ्र असेल. आजचे तापमान किमान 16 ते कमाल 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

 

हेही वाचा:

Pune Weather Update : पुढील दोन दिवस पुणं गारठणार; ऑक्टोबर हिटपासून पुणेकरांना दिलासा

 

 

 

[ad_2]

Related posts