Gold Silver Rate On 26 October 2023 In Gold Silver Price Rises In MCX Check City Wise Price

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gold Price Rate : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या हंगामात मोठ्या प्रमाणात सोन्याच्या चांदीची खरेदी होताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला कात्री बसू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याचा दर हा 61000  रुपयांच्या जवळ पोहोचला आहे, तर चांदी 72000 रुपयांच्या वर आहे. 

आज सकाळी सोन्याचा दर हा 60,824 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​होता. त्यानंतर त्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 91 रुपयांची म्हणजेच 0.15 टक्क्यांनी वाढून 60,917 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. काल फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव 60,826 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.

चांदी 72,000 रुपयांच्या पुढे 

सोन्याव्यतिरिक्त चांदीमध्येही आज तेजी पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आज चांदी 71 हजार 799 रुपयांच्या पातळीवर उघडली. यानंतर, आणखी वाढ नोंदवली गेली आणि कालच्या तुलनेत 222 रुपये म्हणजेच 0.31 टक्के वाढीसह ते 72,009 रुपये प्रति किलोच्या पातळीवर राहिले. काल मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदी 71,787 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर किती? 

दिल्ली- 24 कॅरेट सोने 62,110 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
कोलकाता- 24 कॅरेट सोने 61,960 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
मुंबई- 24 कॅरेट सोने 61,960 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
चेन्नई- 24 कॅरेट सोने 62,200 रुपये, चांदी 78,000 रुपये प्रति किलो
पाटणा- 24 कॅरेट सोने 62,010 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
जयपूर- 24 कॅरेट सोने 62,110 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
नोएडा- 24 कॅरेट सोने 62,110 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
गुरुग्राम- 24 कॅरेट सोने 62,110 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
गाझियाबाद- 24 कॅरेट सोने 62,110 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
लखनौ- 24 कॅरेट सोने 62,110 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो
पुणे- 24 कॅरेट सोने 61,960 रुपये, चांदी 75,100 रुपये प्रति किलो

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ

देशांतर्गत बाजाराशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 0.4 टक्क्यांनी वाढले आहे. तर चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 0.2 टक्क्यांच्या वाढ झाली आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धानंतर सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून  सोन्याचा विचार करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Gold : भारतात सोन्याची तस्करी वाढली, चोरीचे तब्बल 2000 किलो सोने जप्त 

[ad_2]

Related posts