Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 2nd June 2023 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

Shivrajyabhishek Din 2023: अवघ्या महाराष्ट्राची कूस कृतार्थ झाली, किल्ले रायगड शहारला, शिवबा सिंहासनाधीश्वर झाले…; आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन

रायगड: अखंड महाराष्ट्राच्या मनामनात आणि इथल्या भूमीच्या कणाकणात महिरपी रुपात कोरलेला अभिमानास्पद क्षण म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. हा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, आपले शिवराय राजं झालं…. आणि श्रमिकांच्या, शेतकऱ्यांच्या तसेच गोरगरीबांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले शिवबा सिंहासनावर आरूढ झाले. हे घडत असताना अवघ्या महाराष्ट्राची कूस कृतार्थ झाली, किल्ले रायगड शहारला, झाडांची सळसळ वाढली. पशुपक्षांनी केलेल्या चिवचिवाटाच्या आनंदलहरी अवघ्या महाराष्ट्रावर पसरल्या. सूर्यदेवाने कुर्निसात करत, चंद्रमौळी किरणांचा वर्षाव अवघ्या राज्याभिषेकावर केला. या घटनेला आता 349 वर्षे सरली. मात्र आजही या सोहळ्याचं तेज उत्तरोत्तर वाढत गेलं. अजूनही ही मराठमोळी धरणी या क्षणांच्या आठवणींनी मोहरून जाते. दुर्गराज रायगडवर आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. वाचा सविस्तर 

Agni-1 Ballistic Missile : भारताने अग्नी-1 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं आहे. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ (DRDO – डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गेनायझेशन) नं अग्नी-1 या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं आहे. गुरूवारी, 1 जून रोजी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडद्वारे अग्नी-1 या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचं प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. वाचा सविस्तर

GST Collection:  जीएसटीने सरकारच्या तिजोरीत भर; एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यातील कर संकलनात घट

GST Collection:   अर्थ मंत्रालयाने आज मे महिन्यातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाची आकडेवारी जारी केली आहे. मे महिन्यात केंद्र सरकारने एक लाख 57 हजार 90 लाख कोटींची कमाई केली आहे. मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात जीएसटीत वाढ झाली आहे. मे 2022 मध्ये एक लाख 40 हजार 885 लाख कोटी रुपयांचा कर जमा करण्यात आला होता. मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात जीएसटी करात 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, मागील एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जीएसटीत घट झाली आहे. एप्रिल महिन्यात 1.87 लाख कोटी रुपयांचा कर सरकारला मिळाला होता. वाचा सविस्तर 

news reels Reels

Mohan Bhagwat: छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य

Mohan Bhagwat:  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र असे मत संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर 

WMO: IMD संचालक मृत्युंजय महापात्रा यांची जागतिक हवामान संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

WMO Vice-President: भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा (Mrityunjay Mohapatra) यांची गुरुवारी (1 जून) जागतिक हवामान संघटनेचे (WMO) तिसरे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. WMO ने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. मृत्युंजय महापात्रा, मूळचे ओदिशाचे, भारताचे ‘सायक्लॉन मॅन’ म्हणून ओळखले जातात. 2019 पासून ते हवामान खात्याचे प्रमुख आहेत. वाचा सविस्तर 

2nd June in History: तेलंगणा भारताचे 29वे राज्य झाले, दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म आणि दिग्दर्शक राज कपूर यांचं निधन; आज इतिहासात

2nd June in History: जून महिना सुरु झाला आहे आणि इतिहासात आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी तेलंगणा भारताचे 29वे राज्य झाले. आजच्याच दिवशी प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक राज कपूर यांचं निधन झालं होतं. तर, चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म झाला. वाचा सविस्तर 

Horoscope Today 02 June 2023 : वृषभ, कन्या, तूळसह ‘या’ राशीच्या लोकांनी व्यवहारात सावधगिरी बाळगा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 02 June 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल. तर, मिथुन राशीच्या लोकांना गुंतवणुकीचा लाभ मिळेल. धनु राशीच्या लोकांनी कोणाच्याही सल्ल्याशिवाय कोणतेही काम करू नये. आजचा दिवस मेष ते मीन राशीसाठी नेमका कसा असणार? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

[ad_2]

Related posts