Agriculture News Central Government Has Made A Great Plan Onion Price Will Be Controlled

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Onion News : सध्या कांद्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, कांद्याचे दर वाढल्यानं, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. देश पातळीवर सरासरी कांद्याच्या दरात 57 टक्क्यांची वाढ झाल्याचा अहवाल एक दिवसापूर्वी आला होता. वर्षभरापूर्वी या काळात कांद्याचे दर 30 रुपये होता. तोच भाव आता 47 रुपये किलोवर गेला आहे. दरम्यान, या कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं काम सुरु केलं आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. 

सरकार ही पावले उचलणार 

देश पातळीवर कांद्याच्या दरात सरासरी 57 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या कांदा 47 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. त्यामुळं कांद्याच्या किंमती करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं बफर स्टॉकमधून कांद्याची किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला. यातून ग्राहकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी याच कालावधीत कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 30 रुपये प्रति किलो होती. त्यामध्ये सध्या वाढ झाली आहे. दरम्यान, सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळं कांद्याच्या दरात घसरण होणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. 

सरकार बफर स्टॉकमधून कांदा देणार

ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही ऑगस्टच्या मध्यापासून बफर स्टॉकमधून कांदे उपलब्ध करून देत आहोत. किंमती वाढू नयेत आणि ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही किरकोळ विक्री वाढवत आहोत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या राज्यांमध्ये किंमती झपाट्याने वाढत आहेत, तेथे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये बफर स्टॉकमधून कांद्याचा पुरवठा केला जात आहे. ऑगस्टच्या मध्यापासून 22 राज्यांतील विविध ठिकाणी सुमारे 1.7 लाख टन कांद्याचा बफर स्टॉकमधून पुरवठा करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या:

Onion : कांद्याला दराची ‘झळाळी’, शेतकरी दु:खी कारण; दर आहे पण कांदा नाही

[ad_2]

Related posts