Maratha Reservation Maratha And Kunbi Same What Exactly Is In A Viral Gazetteer Manoj Jarange

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धाराशिव : मराठा आरक्षण (Maratha Rservation) हा सध्या महाराष्ट्रात सर्वात चर्चेत असणार विषय आहे.  सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान उभं करणाराही मुद्दा मराठा आरक्षण हाच आहे. मराठ्यांची कुणबी नोंद करून, ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी केली जातेय. त्यासाठी सरकारकडून जुने संदर्भ तपासण्याचंही काम सुरू आहे.  त्यातच आता सोशल मीडियावर एक गॅझेटियर व्हायरल झालंय आणि त्यात 1881 सालाचा दाखला दिला गेलाय. हैदराबाद ते तुकोबांचा अभंग अशा संदर्भांनी मराठा आरक्षणाबाबत नवा सूर उमटत आहे.

मराठा आणि कुणबी एकच?अशा प्रतिक्रिया उमटत असतानाच सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झालं आहे. ज्यावर बेळगाव गॅझेटिअर आणि सातारा गॅझेटिअरची नोंद आहे. 

मुंबई  गॅझेटिअर , सातारा भाग 15, 75 मध्ये लिहिले आहे की…

कुणबी म्हणजेच मराठा… साताऱ्यात बहुतेक लोक मराठा जातीचे आढळून येतात. सन 1881 सालच्या  खानेसुमारीत मराठा जात कुळवी या सदरात दाखल करण्यात आली आहे. 

तर मुंबई  गॅझेटिअर , बेळगांव भाग 21, पृष्ठ 126 मध्ये म्हटले आहे की, 

बेळगावमध्ये मराठा जातीची लोकसंख्या 11 लाख 93 हजार आहे. शेती करणाऱ्या मराठ्यांना कुणबी म्हणतात. मराठा जातीच्या मुलाशी कुणबी जातीच्या मुलीचं लग्न लावण्यास हरकत नाही. मराठा समाजाचे लोक फार मेहनती, मजबूत संभावित असतात मात्र त्यांचा स्वभाव गरम असतो. मराठा लोक शूर, राजनिष्ठ शिपाई आहेत. जमीनदार, शेतकरी, वकील, व्यापारी, शिपाई, मजूर, कारकून, पट्टेवाले आणि साधे नोकर धंद्यात आहेत. 

इतिहासाची पानं चाळून कुणबी मराठा नोंदीचा शोध सुरु झाला.  महाराष्ट्रातील आरक्षणाचा गुंता सोडवण्यासाठी हैदराबादची वाट धरावी लागली काही मराठ्यांची नोंद कुणबी झाल्याचं आढळलं आणि  पुरावे गोळा करण्याची लगबग सुरु झाली

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात तुकोबांचा एक अभंगही चर्चेत आहे

बरा देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ।।
भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ।।

अर्थ-

बरे झाले देवा, तू मला कुणबी मध्ये जन्माला घातलेस,
नाहीतर मी उच्च जातीच्या गर्वाने मेलो असतो

2016 पासून असंख्य मराठा मोर्चे निघाले त्यावेळी मागणी वेगळी होती. कुणी ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणत नव्हतं. त्यावेळी दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही तेव्हापासून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळालं तर ते टिकेल याची जाणीव मराठा समाजाच्या आंदोलकांना झाली. तसं आरक्षण मिळवण्यासाठी कुणबी असल्याचं सिद्ध करावं लागेल आणि त्याच अनुशंगाने
न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीसमोरअनेक जुने ऐतिहासिक पुरावे सादर केले गेले. मात्र अशा पुराव्यांना छेद देण्यासाठी काही मंडळी 96 कुळी मराठे आणि इतर वेगळे असल्याचं सांगत आहेत. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनं केली जाता आहेत. मंत्र्यांना गावबंदी करण्यात आली आहे. सरकारला अल्टीमेटम देण्यात आला आहे. अशावळी कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी काही ठोक ऐतिहासीक पुरावे मिळणं गरजेचं आहे.  

हे ही वाचा :

Satara News : मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदीचा वणवा सातारा जिल्ह्यातही पोहोचला, राजकीय नेत्यांना ‘या’ गावात बंदी, मतदानावर बहिष्कार!

[ad_2]

Related posts