Youth Committed Suicide For Maratha Reservation By Keeping Status In Latur

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लातूर : जिल्ह्यातील ढाळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्यने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून तो मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) चिंतेत होता. त्यामुळे, “दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही,” असा स्टेटस ठेवून या तरुणाने स्वतःच जीवन संपवलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महेश कदम असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.                   

मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होतांना दिसत आहे. मात्र, अजूनही यावर तोडगा काढण्यास सरकारला यश मिळाले नाही. त्यामुळे अनेक तरुण आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवत आहे. दरम्यान, लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव येथील तरुण ग्रामपंचायत सदस्याने देखील आज आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली आहे. “दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही असं स्टेटस ठेवून या युवकाने  आत्महत्या केली. महेश कदम असं मयत युवकाचे नाव असून, घरची परिस्थिती चांगली असली तरी मराठा आरक्षणाबाबत तो सतत चिंतेत होता. त्यामुळे त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. 

सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नसल्यामुळे गावागावातील तरुण आता आक्रमक होत आहेत. मनोज जरांगें पाटील यांच्या उपोषण सुरू झाल्या पासून आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. अनेक तरुण आक्रमक पद्धतीने आंदोलनात उतरले आहेत. नेत्यांना गावबंदी करणे, विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन, उपोषण, धरणे अशा बाबी सुरू आहेत. त्यातच आता काही तरुण आत्महत्या करताय जे विदारक आहे. अशीच आत्महत्या लातूर जिल्ह्यात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरक्षणावरून सातत्याने चिंतेत होता.

महेश कदम हा 26 वर्षाचा तरुण ढाळेगावचा ग्रामपंचायत सदस्य आहे. घरी उत्तम प्रकारची शेती आहे. शिक्षण झालेला असल्याने नोकरीच्या शोधात तो होता. वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात महेश सक्रिय कार्यकर्ता म्हणून मागील अनेक दिवसांपासून काम करत होता. मात्र, मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नसल्याने तो सातत्याने चिंतेत होता. यातच त्याने स्टेटस ठेवत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद 

किनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाळेगावमध्ये झालेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासन हादरून गेला आहे. पोलिसांनी याबाबतच तपास सुरू केला आहे. मृतदेहावर पोस्टमार्टम करण्यात आला असून, आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अहमदपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठा आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

[ad_2]

Related posts