Seven People Of Same Family Committed Suicide In Surat Gujarat Suicide Crime News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gujarat Surat Crime News: गुजरातच्या (Gujarat News) सूरतमध्ये (Surat News) घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेनं दिल्लीतील (Delhi Crime) बुराडी सामुहिक आत्महत्या प्रकरणाची (Delhi Burari Mysteries Death) आठवण करुन दिली. या घटनेनं गुजरातसह संपूर्ण देशच हादरुन गेला होता. गुजरातच्या सूरतमध्ये एकाच कुटुंबातल्या सात जणांनी आत्महत्या केली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संपूर्ण कुटुंबानं आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी. कुटुंबातील सात जणांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे.

गुजरातच्या सूरतमध्ये एकाच कुटुंबातल्या सात जणांनी आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळतेय. या सात जणांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. कनुभाई सोलंकी आणि त्यांच्या कुटुंबानं राहत्या घरातच आत्महत्या केली आहे. कनुभाई यांचा मुलगा मनिषचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तर कनुभाई, त्यांची पत्नी शोभनाबेन, मनिषची पत्नी रीटा, मनिषच्या 10 आणि 13 वर्षांच्या मुली दिशा आणि काव्या तर मुलगा कुशल यांचे मृतदेह अंथरुणावर पडलेल्या अवस्थेत मिळाले.

धक्कादायक घटनेसंदर्भात माहिती देताना झोन 5 चे डीसीपी राकेश बारोट म्हणाले की, ही घटना अडाजन परिसरातील सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये घडली. अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर कनुभाई सोळंकी हे कुटुंबासह राहत होते. कनुभाई यांचा मुलगा मनीष उर्फ ​​शांतू सोळंकीचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता, तर कनुभाई, त्यांची पत्नी शोभनाबेन, मनीषची पत्नी रिटा, मनीषच्या 10 आणि 13 वर्षांच्या मुली दिशा आणि काव्या तसेच, लहान मुलगा कुशल यांचे मृतदेह बेडवर आढळून आले.

सुसाईड नोटमध्ये कर्ज परत न केल्याचा उल्लेख : डीसीपी

डीसीपी घटनेसंदर्भात माहिती देताना पुढे म्हणाले की, “पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मनीष सोलंकी इंटेरिअर डिझाइन आणि फर्निचरचा व्यवसाय करत होता. घरातून सुसाईड नोट आणि रिकामी बाटलीही सापडली आहे. ज्यात बहुधा विष असावं. सुसाईड नोट आणि रिकामी बाटली पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. फासावर लटकलेल्या मनीष व्यक्तीरिक्त सर्व मृतांचा मृत्यू विषामुळे झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. मनीषच्या घरातून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कुटुंबाकडून दिलेले पैसे परत न मिळाल्यानं आर्थिक विवंचनेमुळे त्यानं आत्महत्या केल्याचं नमूद केलं आहे.

या घटनेबाबत सुरतचे महापौर निरंजन जंजमेरा म्हणाले, “मनीष सोलंकीनं गळफास घेण्यापूर्वी त्याच्या कुटुंबीयांना विष पाजलं केल्याचं दिसतंय. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.”

दिल्लीतील बुराडी सामुहिक आत्महत्या प्रकरण

2018 मध्ये राजधानी दिल्लीतील एका घटनेनं संपूर्ण देश हादरला होता. बुराडी भागातील एकाच घरात 11 मृतदेह सापडल्याची घटना दिल्लीत घडलेली. मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता. मृतांमधील सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील सदस्य होते. सर्वांनी आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. पोलीस घटनेचा कसून तपास करत होते. तपासाअंती अंधश्रद्धेतून कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं. सर्व मृतदेह घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. दिल्लीतील बुराडी येथे राहणाऱ्या भाटिया कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. दिल्लीतील ज्या घरात या 11 जणांना मृत्यू झाला, त्या घरात 11 पाईप लावलेले मिळाले. या पाईप्सवरुन अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

“खूपच लवकर Tinder वर आलायस”, डेटिंग अॅपवर मृत पत्नीचा मेसेज, नवऱ्याची भंबेरी; मग पुढे जे घडलं, ते फारच भयानक!

[ad_2]

Related posts