Pune Fire News Fire Brigade Saved 9 Year Old Girl Stuck In Fire In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune News: पुणे : अग्निशमन दलाच्या जवान (Pune Fire) सामान्य नागरिकांसाठी कायम देवदूत ठरत असतात. आतापर्यंत अनेकांचा जीव या जवानांनी वाचवल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा पुण्यातील एका माहिलेसाठी अग्निशमन दलाचे जवान देवदूत ठरले आहेत. धनकवडी परिसरात इमारतीला लागलेल्या आगीत अडकलेल्या महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली आहे. त्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे. 

धनकवडीतील पहिल्या मजल्यावर एका इमारतीला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. त्याचवेळी तिथेच एका खोलीत एक महिला धुरामुळे अडकली असल्याने जवानांनी तातडीने बीए सेट परिधान करत खोलीत प्रवेश करुन महिलेला सुखरुप बाहेर काढले तर इतर जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करत सुमारे पंधरा मिनिटात आग पूर्ण विझवली. आग कशामळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नसून आगीमधे सदनिकेचे मोठे नुकसान झाले असून गृहपयोगी वस्तू जळाल्या आहेत. 

महिलेचा जीव वाचवल्यामुळे इमारतीतील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले. आग लागताच बराच गोंधळ निर्माण झाला होता. सगळे नागरिक सैरावैरा पळत इमारत खाली करत होते. त्याच वेळी ही महिला अडकली होती. पुण्यात आगीच्या घटना वाढत आहे. अनधिकृत बांधकाम, शॉर्ट सर्किट ही आगीची कारणं समोर आली आहे. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी

पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी बजावली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले यांनी देखील कुटुंबीयांना जत्रेला घेऊन जात असताना रस्त्यावर पेट घेत असलेली गाडी पाहिली आणि जीवाची तमा न बाळगता कुटुंबीयांना सोबत घेत गाडीची आग विझवली होती. त्यांनी कुटुंबीय सोबत असताना आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टीवर असताना केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झालं होतं. पुण्यातील उंड्री परिसरात रात्री एका चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी ऑफ-ड्युटी असलेला अग्निशमन दलाचा जवान मदतीसाठी आला. पेटलेली गाडी पाहून त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. मग धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अजितदादा आणि फडणवीसांना कार्तिकी एकादशीला ‘नो एन्ट्री’, ‘आरक्षण न देता येण्याचा प्रयत्न केल्यास काळे फासू’ सकल मराठा समाजाचा इशारा

[ad_2]

Related posts