पोरगा शोधतेय की व्हिडीओ एडिटर? रिलस्टारच्या लग्नाची जाहिरात पाहून हेच म्हणाल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Matrimonial ad : लग्न हा एक मोठा प्रश्न आहे. हे नाते निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी दोघांना खूप संघर्ष करावा लागतो. लग्न करणार्‍यांपैकी बहुतेकांचे असं म्हणणे आहे की लग्न करू नये. पण ज्यांचे झालेलं नसतं त्यांना मात्र याचं फार आकर्षण असतं. पण लग्न जुळावं यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करत असतात. यासाठी काहीजण जाहिरीतीदेखील देतात. लग्नाच्या जाहिराती या सहसा वराला किंवा वधुला काय हवं आहे हे सांगत असतात. बहुतेक जाहिरीतांमध्ये, वधू किंवा वर शैक्षणिक पात्रता, धर्म, नोकरी आणि उंचीच्या बाबतीतीलीत त्यांच्या अपेक्षा स्पष्टपणे नमूद करतात. पण सध्या व्हायरल होणाऱ्या एका मॉर्डन जाहिरीतीमध्ये मुलीच्या अपेक्षा पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारलाय.

सध्या सोशल मीडियाचे युग आहे. त्यामुळे या रीलच्या जगात नवरा-बायको आणि प्रियकर-प्रेयसीचे व्हिडिओ भरलेले आहेत. आजकाल तर मला असा नवरा हवी की अशी बायको हवी अशा रील्स देखील व्हायरल होत असतात. पण या वेगवाग काळात सोशल मीडियावर वर्तमानपत्राची एक वैवाहिक जाहिरात व्हायरल होत आहे, जी पाहून लोक म्हणत आहेत की मुलगी वराच्या शोधात आहे किंवा त्याला नोकरीची ऑफर देत आहे.

काय आहे जाहिरीतामध्ये?

“सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरजोडीदाराच्या शोधात. माझे नाव रिया आहे. मी माझ्यासाठी योग्य जोडीदार + वर शोधत आहे. मुलाने कॅमेऱ्याला घाबरू नये आणि रिलेशनशिप या विषयावर रील बनवणारा हवा. तसेच, त्याला MOI-MOI सारख्या ट्रेंडिंग गाण्यावर कॉन्टेंट कसा तयार करावा हे माहित असले पाहिजे. पण एकत्र कुटुंबात राहणारा मुलगा नको. तसेच भेटायला येण्याआधी ॲमेझॉन मिनी टीव्हीवर ‘हाफ लव्ह हाफ अरेंज’  येताना बघून येणे. जेणेकरून मला कोणती मुले आवडत नाहीत हे तुम्हाला कळेल. आणि हो, त्या व्यक्तीला प्रीमियर प्रो माहित असले पाहिजे जेणेकरून तो माझे रील/व्लॉग एडिट करू शकेल,” अशा अटी या तरुणीने लग्नाच्या जाहिरातीमध्ये ठेवल्या आहेत.

 

ही लग्नाची जाहिरात पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कदाचित ही आतापर्यंतची सर्वात अनोखी वैवाहिक जाहिरात आहे, असे म्हणत आयुषी गुप्ता नावाच्या युजरने ती पोस्ट केली होती. ही पोस्ट लिहिपर्यंत या पोस्टला जवळपास एक लाख व्ह्यूज आणि आठ हजार हजार लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने तर Reel-ationship गोल!, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या एका युजरने, मी यासाठी प्रबळ दावेदार आहे, असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने ही नोकरीची जाहिरात आहे की लग्नाची? असं म्हटलं आहे.

Related posts