Satara Maharashtra Band To Support Manoj Jarange Protest For Maratha Reservation Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सातारा : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. त्यातच राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं अधिक तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळत. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार (30 ऑक्टोबर) रोजी सातारा बंदची हाक देण्यात आलीये. त्यामुळे सातारा (Satara) जिल्हा हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाची बैठक ठेवण्यात आली होती. याच बैठकीत जिल्हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या बंदमध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने एसटी, महामार्ग बंद ठेवण्यास देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता उद्याचा हा सातारा बंद पाळण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
राज्यात मराठा आंदोलानाची धक सध्या वाढत चालली असून हे आंदोलन दिवसागणिक अधिक तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळतयं. त्यातच अनेक ठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटना देखील घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

साताऱ्यातील मांढरदेवी मंदिरात राजकारण्यांना बंदी

 मराठा आंदोलनाची धग गावापासून आता मंदिरांपर्यंत पोहचल्याचं दिसून येतंय. साताऱ्यातील मांढरदेवी गडावर  आता राजकारण्यांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आता मांढरदेवी गडावरील काळूबाईचे दर्शन घेता येणार नाही. मंदिराबरोबर गावात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

साताऱ्यातील मांढरदेवी गावात आता राजकारण्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच मांढरदेवी गडावरील काळूबाईचे दर्शनासही बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजातील अंदोलकांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मांढरदेवी ग्रामपंचायतीनेही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी आमदार आणि खासदारांची घरे जाळण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केल्यानंतर राज्यातील गावांमध्ये पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली. त्यामुळे आता जिल्हा बंदची हाक पुकारल्यानंतर राज्यातील वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यावर सरकार कोणती भूमिका घेणार हे येणाऱ्या काही काळातच स्पष्ट होईल. पण त्याआधी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

हेही वाचा : 

Maratha Reservation : राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घराची जाळपोळ, मंत्रिमंडळ बैठकीत धग जाणवणार? अजित पवार गटाचे मंत्री गृहखात्याला जाब विचारण्याची शक्यता

[ad_2]

Related posts