[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नेरुळमधील वंडर्स पार्क हे नवी मुंबई शहरातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. नवी मुंबई शहरातील तसेच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या भागातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ आहे.
सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या या उद्यानात नुकतेच आकर्षक राईड्स, कारंजे आणि लेझर शो सादर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी संध्याकाळी वंडर्स पार्कचे उद्घाटन करण्यात आले. (Navi Mumbai News)
कोरोना विषाणूमुळे पार्क 3 वर्षांहून अधिक काळ सर्वसामान्यांसाठी बंद होते. त्यामुळे मुलांना तसेच शाळेला सुट्टी लागलेल्या पालकांना उद्यान कधी उघडणार याची उत्सुकता होती. (Navu mumbai wonders park)
या उद्यानात रोमांचक खेळणी, जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती असलेले अॅम्फी थिएटर, आकर्षक तलाव, लेझर शोसह नवीन डिझाइन केलेले म्युझिकल कारंजे असलेले प्रशस्त खेळाचे क्षेत्र, तलावांचे नूतनीकरण, पदपथांची सुधारणा, नवीन खेळाची उपकरणे आदी आहेत.
27 कोटींहून अधिक खर्च करून वंडर्स पार्कचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, प्रवेशद्वारावर बायोमेट्रिक मशीन बसवणे, नवीन विद्युत दिवे बसवणे आदी कामे करण्यात आली आहेत.
हेही वाचा
[ad_2]