“पोलीस काही तोफ नाहीत”; पॅन्टची चैन उघडूव महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घडवली अद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gujarat Crime : गुजरातच्या (Gujarat Crime) वापीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वलसाड पोलिसांनी एका ऑटोरिक्षा चालकाला (autorickshaw driver) एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. एका क्षुल्लक मुद्द्यावरून रिक्षा चालकाने महिलेसोबत वाद होता आणि अयोग्य वर्तन केले. रिक्षा चालकाच्या त्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी (Gujarat Police) या प्रकरणाची दखल घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने महिलेची माफी मागितल्याचेही समोर आले आहे.

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली होती. एका ऑटोचालकाने वादावादीदरम्यान महिला ऑटो चालकाला अर्वाच्य भाषा बोलून पॅन्टची चैन उघडण्याचा प्रयत्न केला. ‘पोलिस माझे काहीही करू शकत नाहीत. पोलीस काही मोठी तोफ नाहीत, असेही ऑटोचालकाने म्हटले. मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ सय्यद असे आरोपीचे नाव आहे. नंतर त्याला महिलेची माफी मागायला लावली.

गुजरातमध्ये 29 मे रोजी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र, 31 मे रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांपर्यंतही तो पोहोचला. पोलिसांनी काही वेळातच ऑटोचालकाला अटक केली. पोलिसांनी आरोपीने माफी मागायला लावली आणि नंतर माफी मागणारा दुसरा व्हिडिओ जारी केला. 

आरीफ मोहम्मद अबुशाद सय्यद वापी येथील गीतानगर रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा चालवतो आहेत. प्रवाशांना घेऊन जाण्यावरुन त्याचा महिला ऑटोचालकाशी वाद झाला. वाद सुरू असताना आरिफने महिलेसोबत गैरवर्तन केले. आरिफने महिला ऑटोचालकासमोर पँटची चैन उघडण्याचा प्रयत्न केला. पोलिस माझ्यासोबत काहीही करू शकत नाहीत, असेही आरिफ व्हिडीओमध्ये म्हणत होता. आरिफने पोलिसांबद्दल अपमानास्पद भाषाही वापरली. आजूबाजूचे लोकही त्याला थांबवत होते, पण तो थांबला नाही. त्यानंतर महिला ऑटो चालकाने आरिफचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यास सुरुवात केली.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरिफला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला घटना घडलेल्या ठिकाणी नेले आणि त्याला जाहीर माफी मागण्यास सांगितले. त्यानंतर आरिफचा माफी मागणारा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला. यावेळी त्याला एका पत्रकाराने विचारले की वलसाड पोलिसांबद्दल तुझे काय म्हणणे आहे? तू पुन्हा स्त्रियांचा विनयभंग करशील का? पोलिसांना पुन्हा आव्हान देणार का? असे प्रश्न विचारले. त्यावर आरिफने फक्त नाही असे उत्तर दिलं.

Related posts