Congress Leader Sachin Pilot Has Divorced Sara Abdullah Big Revelation Made In Election Affidavit Rajasthan Election Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी पत्नी सारा अब्दुल्ला (Sara Abdullah) हिला घटस्फोट (Divorced) दिला आहे. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आलीये. सारा अब्दुल्ला या जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्या कन्या आहेत. सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला यांचा विवाह 2004 मध्ये झाला होता.

25 नोव्हेंबरला होणाऱ्या राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रिया 30 ऑक्टोबरपासून सुरू झाली. सचिन पायलट यांनी मंगळवारी (31 ऑक्टोबर) टोंक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला.  तेव्हा त्यांचा घटस्फोट झाल्याचे समोर आले.निवडणूक शपथपत्रात त्यांनी त्यांचा घटस्फोट झाल्याचं लिहिलं. 

सचिन पायलट आणि सारा अबदुल्ला यांना दोन मुलं

सचिन पायलट आणि सारा अबदुल्ला यांना दोन मुलं होतं. आरन पायलट आणि विहान पायलट अशी त्यांची नावं आहेत. 2018 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात सचिन पायलटनेही सारा अब्दुल्ला यांच्या मालमत्तेचा तपशील दिला होता, मात्र यावेळी त्यांच्या संपत्तीचा तपशील शपथपत्रात दिला नाही. 

सचिन पायलट आणि सारा अबदुल्ला यांच्यात कसं खुललं प्रेम? 

सारा अब्दुल्ला आणि सचिन पायलट अमेरिकेत शिकत असताना संपर्कात आले. सचिन पायलट अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीए करण्यासाठी गेला होता. येथेच त्याची सारासोबत भेट झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सचिन पायलट त्यांचे एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीला आले. परंतु सारा या त्यांच्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतच राहिल्या. त्यानंतर दोघेही ई-मेल आणि फोनवरून बोलायचे.

जवळपास तीन वर्षे डेट केल्यानंतर दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कुटुंबियांना सांगितले. सुरुवातील सचिन पायलट यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. पण त्यानंतर त्यांनी संमती दिली.  अखेर दोघांनी 2004 मध्ये लग्न केले. साराचे कुटुंबीय या लग्नाला आले नव्हते. हळूहळू अब्दुल्ला कुटुंबानेही सचिन आणि सारा यांच्या नात्याचा स्वीकार केला.

कोण आहे सारा अबदुल्ला?

की सारा अब्दुल्ला या जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्या कन्या आहेत.सारा अब्दुल्ला या सेंटर फॉर इक्विटी अँड इन्क्लुजन (CEQUIN) च्या अध्यक्षा आहेत. ही एक  ही एक एनजीओ आहे, जी सारा आणि लोरा प्रभू यांनी 2009 मध्ये स्थापन केली होती. ही संस्था महिलांसाठी कार्यरत आहे.  तसेच सारा अबदुल्ला या एक योगा शिक्षिका देखील आहेत. 

हेही वाचा : 

Chandra Babu Naidu: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना 52 दिवसांनी दिलासा; वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर

[ad_2]

Related posts