Pm Modi Launches Mera Yuva Bharat Portal Meri Maati Mera Desh What Is Amrit Kalash Yatra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi Launched Mera Yuva Bharat Portal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी तरुणांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधानांनी ‘मेरा युवा भारत पोर्टल’ लाँच केलं आहे. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी हे पोर्टल लाँच केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबरला दिल्लीतील मेरी माती मेरा देश-अमृत कलश यात्रेच्या समारोप समारंभात ‘मेरा युवा भारत पोर्टल’ व्हर्च्यूअली (Virtually) लाँच केलं. ‘माती मेरा देश’ मोहिमेचा समारोप समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे अमृत कलशात माती अर्पण केली.

मेरी माती मेरा देश-अमृत कलश यात्रेच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जेव्हा हेतू चांगला असतो आणि राष्ट्राची भावना प्रथम सर्वोपरी असते, तेव्हाच परिणाम सर्वोत्तम असतात. ‘आझादी का अमृत महोत्सव’ दरम्यान, भारताने अनेक ऐतिहासिक कामगिरी केली. ‘आझादी का अमृत महोत्सवा’ दरम्यान देशाने राजपथ ते कर्तव्यपथ हे अंतर कापलं”

 

 

 

 



[ad_2]

Related posts