Free LPG Cylinder, Cylinder In Up Know Who Are The Beneficiaries And How To Apply 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

LPG Cylinder : केंद्र आणि राज्य सरकार देशातील नागरिकांसाठी सातत्यानं विविध योजना राबवत असते. या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. उत्तर प्रदेश सरकारने (UP Govt) दिवाळीपूर्वी राज्यातील नागरिकांना एक अनोखी भेट दिली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना (Free LPG Cylinde) वर्षभरात दोन मोफत सिलिंडर देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारनं घेतला आहे. 

राज्यातील 1.75 कोटी कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर मिळणार

दिवाळीपूर्वी उत्तर प्रदेश सरकारने महिलांना एक अप्रतिम भेट दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोफत गॅस देण्याच्या निर्णयावर सहमती झाली आहे. त्यामुळं आता राज्यातील 1.75 कोटी कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने जारी केलेल्या जाहीर ठरावात दिवाळी आणि होळीच्या मुहूर्तावर महिलांना मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी दिवाळीपूर्वी राज्यातील सुमारे 1.75 कोटी कुटुंबांना मोफत एलपीजी सिलिंडर मिळणार असल्याचे सांगितले आहे. सिलिंडर देण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पात 3301.74 कोटी रुपयांची तरतूद होती. अर्थसंकल्पातील रकमेतून, राज्य सरकार उज्ज्वला योजनेच्या प्रत्येक लाभार्थीच्या खात्यावर 660 रुपये पाठवेल. त्याचबरोबर केंद्र सरकार 300 रुपये अनुदान देणार आहे.

अनुदानात केली वाढ 

या व्यवस्थेअंतर्गत या कुटुंबांना दिवाळीपूर्वी मोफत गॅस सिलिंडर मिळू शकणार आहे. तर होळीच्या दिवशीही या बजेटमधून मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. सध्या, पंतप्रधान मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपये केले आहे. अहवालानुसार, लाभार्थी कुटुंबांना प्रथम 14.2 किलोचा सिलेंडर भरावा लागेल. 5 दिवसांनंतर, तेल कंपन्यांकडून सिलिंडरची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. उज्ज्वला योजनेच्या एका कनेक्शनवर मोफत सिलिंडर सुविधा उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना 2023-24 आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 आणि जानेवारी-मार्च 2024 या तिमाहींमध्ये प्रत्येकी एक विनामूल्य सिलिंडर रिफिल करता येईल.

असा करावा लागणार अर्ज 

मोफत सिलेंडरचा लाभ घेण्यासाठी प्रथम popbox.co.in/pmujjwalayojana वर जा. यानंतर येथे एक फॉर्म डाऊनलोड करा. त्यानंतर अर्ज डाऊनलोड करा आणि सर्व तपशील त्यामध्ये भरा. त्यानंतर जवळच्या गॅस एजन्सीमध्ये फॉर्म सबमिट करा. त्यानंतर कागदपत्र पडताळणीचे काम होईल. त्यानंतर तुम्हाला उज्ज्वला योजनेअंतर्गत नवीन कनेक्शन दिले जाईल.

महत्त्वाच्या बातम्या:

नेमकी काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना? कोणाला मिळणार ‘या’ योजनेचा लाभ

[ad_2]

Related posts