Gold Silver Rate On 3 November 2023 In Gold Price Rises Silver Dips In Multi Commodity Exchange Check Latest Prices 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gold Silver Price: दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. सणासुदीच्या काळात दागिन्यांच्या दुकानात मोठी गर्दी दिसून येते. धनत्रयोदिवशी सोनं  खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. दरम्यान, जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आज सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. तर वायदा बाजारात आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

आज बाजार उघडल्यानंतर आज सोने 60 हजार 911 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर उघडला. यानंतर, त्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात 21 रुपये म्हणजेच 0.03 टक्के वाढ झाली आहे. आज सोन्याचा दर हा 60 हजार 932 रुपये आहे. काल मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने 60 हजार 911 रुपयांवर बंद झाला होता.

चांदीच्या दरात घसरण 

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्यामध्ये किंचित वाढ होत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण नोंदवली जात आहे. आज सुरुवातीच्या टप्प्यात चांदी 71 हजार 170 रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडली. यानंतर, त्याच्या किंमतीत काही सुधारणा झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 173 रुपये म्हणजेच 0.24 टक्के घसरण झाली आहे. सध्या चांदी 71 हजार 227 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे. काल वायदे बाजारात चांदी 71 हजार 400 च्या पातळीवर बंद झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ

आज म्हणजे 3 नोव्हेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीबद्दल बोललो, तर त्यात आज वाढ दिसून येत आहे. मेटल रिपोर्टनुसार, आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 0.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर हे कालच्या तुलनेत 0.23 टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत.

जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर

नवी दिल्ली- 24 कॅरेट सोने 62,180 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,100 रुपये प्रति किलो
मुंबई- 24 कॅरेट सोने 61,750 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,100 रुपये प्रति किलो
कोलकाता- 24 कॅरेट सोने 61,750 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,100 रुपये प्रति किलो
चेन्नई- 24 कॅरेट सोने 62,180 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 77,000 रुपये प्रति किलो
गुरुग्राम- 24 कॅरेट सोने 61,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,100 रुपये प्रति किलो
नोएडा – 24 कॅरेट सोने 61,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,100 रुपये प्रति किलो
लखनौ- 24 कॅरेट सोने 61,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,100 रुपये प्रति किलो
पाटणा- 24 कॅरेट सोने 61,800 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,800 रुपये प्रति किलो
जयपूर- 24 कॅरेट सोने 61,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,100 रुपये प्रति किलो
गाझियाबाद- 24 कॅरेट सोने 61,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,100 रुपये प्रति किलो
वाराणसी- 24 कॅरेट सोने 61,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,100 रुपये प्रति किलो
कानपूर- 24 कॅरेट सोने 61,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,100 रुपये प्रति किलो

महत्त्वाच्या बातम्या:

Dhanteras: धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी करायचीय? ‘या’ 10 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकतो तोटा

[ad_2]

Related posts