IT Recruitment News Hyderabad Jobs IIT Recruitment 2023 Apply For Various Posts

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IIT Hyderabad Jobs 2023: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात IIT हैदराबादमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार अधिकृत साईटवर जाऊन अर्ज करु शकतात. याबाबतची भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे. 

अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील शैक्षणिक आणि शिक्षकेतर गट अ, ब आणि क पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. गट अ अंतर्गत 1 पदांसाठी, गट ब अंतर्गत 30 पदे आणि गट क अंतर्गत 58 पदांसाठी भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी विविध पात्रता विहित करण्यात आली आहे. भरतीसाठी अर्ज करण्‍यासाठी, उमेदवाराकडे SSC/ ITI/ डिप्लोमा/ पदवी/ पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदवी इ. पदानुसार संबंधित क्षेत्र/ ट्रेड असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा

गट अ पदासाठी भरतीसाठी अर्ज करणारे कमाल वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे, गट ब साठी 35 ते 40 वर्षे आणि गट क साठी 35 वर्षाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया अशी असेल? 

निवडलेल्या उमेदवारांना IIT हैदराबादद्वारे चाचणी/मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. जे उमेदवार सर्व टप्प्यावर यश मिळवतील. त्यांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळेल. भरती मोहिमेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन तपशील तपासू शकतात.

कसा कराल अर्ज? 

अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबादला भेट द्यावी लागेल. शिक्षक आणि शिक्षकेतर पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत iith.ac.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

ग्रॅज्युएशनंतर सरकारी नोकरीच्या शोधात आहात? ‘ही’ संधी सोडू नका; करन्सी नोट प्रेसमध्ये मोठी भरती!

 

[ad_2]

Related posts