[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Delhi Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळमध्ये केंद्र, 6.4 रिश्टर स्केलची तीव्रता
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, उत्तराखंड आणि हरियाणासह देशातील अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. 6.4 रिश्टर स्केलची तीव्रता या भूकंपाची होती. तर या भूकंपाचं केंद्र हे नेपाळमध्ये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
[ad_2]