Suceess Story News Agriculture News Farmers Patna Farmer Annually 40 Lakh From Poultry And Horticulture Agar Tree Planted In Bihar Suceess Story 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Success Story : सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. 
शेतीबरोबरच विविध जोडधंद्याच्या माध्यमातून देखील शेतकरी चांगला नफा मिळवत आहेत. बिहारच्या पाटणा येथील रहिवासी असलेले शेतकरी गिरेंद्र शर्मा हे कुक्कुटपालन आणि फलोत्पादनातून वर्षाला 40 लाख रुपये कमावत आहेत. आपल्या शेतीत फळबागांसह औषधी शेतीद्वारे त्यांचे जीवनमान सुधारत आहेत. तसेच त्यांनी आपल्या शेतात चंदनाची  झाडेही लावली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी राजकारण सोडून शेती सुरु केली आहे. 

बिहारची राजधानी पाटणापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिहटा ब्लॉकमधील देहरी गावातील गिरेंद्र शर्मा हे शेतीबरोबर कुक्कुटपालन यातून वर्षाला 30 ते 40 लाख रुपये कमावत आहेत. त्यांचे सध्या 65 वर्ष वय आहे. शेतीतील त्यांना 40 वर्षांचा अनुभव आहे. शेतकऱ्यांनी वेळेनुसार शेतीत वेगवेगळे प्रयोग करत राहावे, अशी त्यांची धारणा आहे. ऐंशीच्या दशकात राजकारणाशी निगडित असलेले गिरेंद्र शर्मा 1990 नंतर शेतीत आले. औषधी शेतीच्या सहाय्याने शेतीत करु लागलेले शर्मा गेल्या आठ वर्षांपासून कुक्कुटपालन आणि गेल्या सहा वर्षांपासून बागायती शेती करत आहेत. त्यांनी परिसरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहेत.

गिरेंद्र शर्मा यांच्या चार एकर क्षेत्रावर बागा आहेत. यामध्ये त्यांनी चंदन, आगर, आंबा, बांबूची झाडे लावली आहेत. यासोबतच ते चार पोल्ट्री फार्म आणि वॉर्मिंग कंपोस्टच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. शेतीत नवनवीन प्रयोग करताना ते आपले वय आड येऊ देत नाहीत. बिहारच्या मातीवर आगराचे झाड लावणारा ते राज्यातील पहिला शेतकरी असल्याचे बोलले जात आहे. आगराचे झाडाला खूप चांगली किंमत मिळते. 

शेतीत नवनवीन प्रयोग करा

1996 मध्ये शर्मा यांनी औषधी वनस्पती म्हणून लेमन ग्रास, मेंथा, पालमा रोझा आणि तुळस यांची लागवड करण्यास सुरुवात केली. बिहारमध्ये लेमन ग्रासची लागवड करणारे ते पहिला शेतकरी असल्याचा दावा केला जातोय. मजुरांच्या कमतरतेमुळं औषधी शेती बंद करावी लागली, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यांनी पोल्ट्री फार्ममध्ये प्रवेश केला. आज ते प्रत्येकी पाच हजार कोंबड्यांचे चार पोल्ट्री फार्म चालवत आहेत. ज्यातून मासिक सुमारे चार लाख रुपये उत्पन्न मिळते. तर बागायतीमध्ये आंब्यापासून सात ते आठ लाख रुपये सहज मिळू शकतात. आंब्याव्यतिरिक्त त्यांनी व्यावसायिक झाडांमध्ये चंदन, आगर आणि सागवानाची झाडेही लावली आहेत. येत्या काही वर्षांत या झाडातून मोठी कमाई होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

पारंपरिक पद्धतीने भात आणि गव्हाचीही लागवड 

कुक्कुटपालन आणि फलोत्पादनासोबतच यशस्वी शेतकरी गिरेंद्र शर्मा हे पारंपरिक पद्धतीने भात आणि गव्हाचीही लागवड करतात. पण ते पोल्ट्री फार्मला त्यांच्या समृद्धीचा मार्ग मानतात. पोल्ट्री व्यवसाय असो की बागकाम, शेतीत काहीतरी नवीन करण्याची कल्पना सोशल मीडियाच्या माध्यमातून येते, असे ते सांगतात. रक्त चंदन आणि आगरची झाडे लावण्याची कल्पना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

नेमकी काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना? कोणाला मिळणार ‘या’ योजनेचा लाभ

[ad_2]

Related posts