Nepal Earthquake Epicentre In Jajarkot News Update Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nepal Earthquake :  नेपाळमध्ये (Nepal) शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळाला. पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे (Nepal Earthquake) मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. नेपाळ गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाजरकोट आणि रुकुम पश्चिममध्ये आतापर्यंत 157 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 200 लोक जखमी झाले आहेत. ते म्हणाले की, “भूकंपामुळे जाजरकोट जिल्ह्यातील 1,800 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर रुकुम पश्चिममध्ये 2,500 घरे उद्ध्वस्त झाली आहेत”. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “भूकंपग्रस्त भागातील बेघर लोकांना तंबू, ब्लँकेट आणि अन्नपदार्थांची नितांत गरज आहे.” तर, जाजरकोट जिल्ह्यातील बरेकोट ग्रामीण नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणाले की, “”भूकंपामुळे त्यांच्या भागातील 80 टक्के घरांचे नुकसान झाले आहे. ” 

बाधित भागाला भेट दिल्यानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी भूकंपग्रस्त भागाला भेट देऊन लोकांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी असं म्हटलं आहे की, “भूकंपग्रस्त भागाचे खूप नुकसान झाले आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आमचे सरकार मदतकार्यात गुंतले आहे. आम्ही नेपाळी आर्मी आणि नेपाळी सेंटिनल तैनात केले आहेत. सर्व जखमींना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात नेण्याची जबाबदारी पोलीस दलाला देण्यात आली आहे. पंतप्रधान दहल पुढे म्हणाले की, जवळपासच्या जिल्ह्यांमधून हेलिकॉप्टरद्वारे वैद्यकीय उपकरणांसह आरोग्य कर्मचारी बाधित भागात पाठवले जात आहेत. सरकार आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडत आहे. रविवारी  या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक तसेच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.

भारताने आपत्कालीन मदत क्रमांक जारी केला

भारताने नेपाळमध्ये राहणाऱ्या भारतीय भूकंपग्रस्तांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केला आहे. +977-9851316807 हा आपत्कालीन क्रमांक आहे. भूकंपग्रस्त लोक परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या या क्रमांकावर संपर्क साधून ज्यांना तात्काळ मदत हवी आहे ते मदतीसाठी आवाहन करू शकतात. 

पंतप्रधानांनीही शोक व्यक्त केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत म्हटले की, ‘भारत नेपाळच्या लोकांबरोबर एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांबरोबर आहोत असं म्हणत शोक व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या :

गरिबीशी लढा देण्यासाठी AI हे शक्तिशाली साधन, स्टार्टअप प्रणालीत देशाची जगात ओळख : गोयल

[ad_2]

Related posts