Abp Cvoter Rajasthan Opinion Polls 2023 Who Will Win In Rajasthan Bjp Or Congress Survey Know More Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Cvoter Opinion Polls: राजस्थान : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या (Rajasthan Assembly Elections 2023) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. राजस्थानमधील (Rajasthan Elections) भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) त्यांच्या योजनांच्या आधारे राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा करत असताना, भाजप नेते यावेळी त्यांचा पक्ष प्रचंड बहुमतानं राजस्थानात निवडणूक जिंकेल, असा दावा करत आहेत. दरम्यान, एबीपी न्यूज (ABP News) आणि सीव्होटरनं (ABP Cvoter) एकत्रितपणे एक सर्वेक्षण केलं आहे, ज्यामध्ये जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

कोणासाठी किती जागा?

एबीपी न्यूजच्या सीव्होटरच्या सर्वेक्षणात राज्यातील जनतेला यावेळी राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कोणता पक्ष निवडणुकांमध्ये विजयी होऊन सरकार स्थापन करेल, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या प्रश्नाच्या उत्तरात भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज लोकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, राजस्थानमध्ये काँग्रेसला 67 ते 77 जागा मिळताना दिसत आहेत, तर भाजपला 114 ते 124 जागा मिळताना दिसत आहेत. याशिवाय इतरांना 5 ते 13 जागा मिळू शकतात.

कोणाला किती मताधिक्य? 

मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झालं तर या सर्वेक्षणानुसार राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये फारसा फरक नाही. यामध्ये भाजपला 45 टक्के तर काँग्रेसला 42 टक्के मते मिळू शकतात. इतरांना 13 टक्के मते मिळू शकतात. 

राजस्थान : एकूण जागा : 200

काँग्रेस : 67-77
भाजप : 114-124
इतर : 5-13

मताधिक्य 

काँग्रेस : 42 टक्के 
भाजप : 45 टक्के
इतर : 13 टक्के

मतदान कधी?

आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकांबाबत बोलायचं झालं तर, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 17 नोव्हेंबरला फक्त मध्यप्रदेशात मतदान आहे. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांचे निकाल 3 डिसेंबरला लागणार आहेत. जिथे 7 नोव्हेंबरला मतदान आहे, तिथे आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे एबीपी न्यूज आज 5 राज्यांच्या निवडणुकांचा सर्वात मोठा आणि अंतिम ओपिनियन पोल दाखवत आहे.

पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. आज संध्याकाळी, छत्तीसगडमधील पहिल्या टप्प्यातील जागांसह मिझोराममध्ये निवडणूक प्रचार संपेल. सी व्होटरनं सर्व 5 राज्यांमध्ये एबीपी न्यूजसाठी अंतिम मत सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात सुमारे 63 हजार लोकांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. 9 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.

[ad_2]

Related posts