[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sharad Pawar : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद मागील काही दिवसांपासून सुरुच आहे. हाच वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी या वादात सक्रिय भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला राज्यभरातील जिल्हा कुस्ती संघ आणि सहयोगी संघ असे मिळून 45 संघांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय बृजभुषण सिंह अध्यक्ष असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाने घेतला. त्यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली नवीन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्तित्वात आली.
या परिषदेकडून पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच आयोजन देखील करण्यात आलं. मात्र बाळासाहेब लांडगे यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निर्णयाला न्यायालयात आवाहन दिलं. न्यायालयाने बाळासाहेब लांडगे सचिव असलेल्या कुस्तीगीर परिषदेच्या बरखास्तीला स्थगिती दिली. त्यामुळे बाळासाहेब लांडगे आणि शरद पवार गटाकडून राज्यातील सर्व जिल्हा कुस्तीगीर संघांना बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे.
वादाच्या पार्श्वभूमीवर पुढे कोणती भूमिका घ्यायची? हे या बैठकीत ठरवण्यात येणार आहे. दुसरीकडे बाळासाहेब लांडगे गटाने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या जिल्हा कुस्ती संघांवर कारवाई करण्याचा इशारा भारतीय कुस्ती महासंघाने मागे दिला होता. मात्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिल्याने शनिवारच्या (3 जून) बैठकीत राज्यभरातील जिल्हा कुस्ती संघांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आता तोडगा निघणार का?
या कुस्तीगीर परिषदेच्या वादात शरद पवार भूमिका स्पष्ट करणार असल्याने हा वाद वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून शरद पवार या सगळ्या वादापासून अलिप्त होते. हा प्रश्न किंवा वाद सामोपचाराने सोडवता येईल का?, अशी भूमिका मांडली होती. दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींशी त्यांनी यापूर्वी बैठका घेतल्या होत्या. आता मात्र बाळासाहेब लांडगे या गटासोबत राहण्याची भूमिका शरद पवार उघडपणे घेताना दिसत आहेत. शरद पवारांच्या उपस्थित असलेल्या बैठकीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद नेमकी कोणाची हे दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण कुस्तीवीरांचं लक्ष लागलं आहे. येत्या काही काळातच यावर तोगडा निघण्याची शक्यता आहे.
[ad_2]