Gujarat Botad district Five Children Drowned Krishna Lake; तलावात बुडून पाच मुलांचा करुण अंत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बोताड : गुजरातच्या बोताड जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. कृष्णा सागर तलावात पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना काल शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. दोन मुले तलावात पोहताना अचानक बुडू लागली. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या इतर तीन मित्रांनी तलावात उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने त्या सर्वांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोताड जिल्ह्यातील कृष्णा सागर तलावात दोन मुले पोहत होती. मात्र, अंदाज न आल्याने ते अचानक बुडू लागली. घटनास्थळी उपस्थित असेलेल्या इतर त्यांच्या तीन मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र, त्यांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
Pune Crime: जेवायला जातो सांगून निघाला, परतलाच नाही, मित्र वाट बघत राहिले; अमरावतीच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू
बोताड चे एस.पी किशोर बलोलिया यांनी एका वृतसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, बोताड शहराबाहेरील कृष्णा सागर तलावात शनिवारी दुपारी दोन पोहत मुलं पोहत असताना बुडू लागली. घटनास्थली उपस्थित असलेल्या इतर तिघांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, हे तिघेही बुडाले. सर्व मुलं १६ ते १७ वयोगटातील आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत, असंही बलोलिया म्हणाले आहेत.

Supreme Court: राहुल नार्वेकरांनी मविआची डोकेदुखी वाढवली; आमदारांच्या अपात्रतेबद्दल लंडनमधून प्रतिक्रिया देत म्हणाले…

[ad_2]

Related posts