Direct Tax Collection Increased Up To 22 Percent Government Get 10 Lakh Crore Rupee

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Direct Tax Collection :  चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रत्यक्ष कर संकलनात (Direct Tax Collection) 22 टक्के वाढ झाली आहे. 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रत्यक्ष कर संकलन 10.60 लाख कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात निश्चित केलेल्या प्रत्यक्ष कराच्या लक्ष्यापैकी 58 टक्के रक्कम आधीच सरकारच्या तिजोरीत जमा झाली आहे. 

CBDT ने प्रत्यक्ष कर संकलनाची तात्पुरती आकडेवारी जाहीर केली आहे, त्यानुसार चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत प्रत्यक्ष कर संकलनात स्थिर वाढ दिसून आली आहे. प्रत्यक्ष कर संकलन 12.37 लाख कोटी रुपये झाले आहे, जे गतवर्षीच्या तुलनेत 17.59 टक्के अधिक आहे. करदात्यांना जारी केलेला परतावा वगळता, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 10.60 लाख कोटी रुपये आहे. जे मागील आर्थिक वर्ष 2022-23 मधील याच कालावधीपेक्षा 22 टक्के अधिक आहे. CBDT चे एकूण प्रत्यक्ष कर संकलन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 58.15 टक्के आहे. 

प्रत्यक्ष कर संकलनात कॉर्पोरेट आयकरात 7.13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर वैयक्तिक आयकरात28.29 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये सुरक्षा व्यवहार कर जोडला तर एकूण वैयक्तिक आयकर संकलनात 27.98 टक्के वाढ झाली आहे.

करदात्यांना जारी केलेल्या परताव्यांच्या समायोजनानंतर, कॉर्पोरेट आयकर संकलनात 12.48 टक्के आणि वैयक्तिक आयकर संकलनात 31.77 टक्के वाढ झाली आहे. आणि STT यामध्ये समाविष्ट केल्यास, वाढीचा दर 31.26 टक्के आहे. या कालावधीत, आयकर विभागाने 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान 1.77 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे.

सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्ष 2023-24  साठी 7.41 कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत, त्यापैकी 53 लाख लोकांनी पहिल्यांदाच आयकर रिटर्न भरला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) डेटा जारी केला आहे. ज्यानुसार 2013-14 मूल्यांकन वर्षात उत्पन्न रिटर्न भरणाऱ्या करदात्यांची संख्या 3.36 कोटी होती. आता, यामध्ये जवळपास 90 टक्क्यांनी वाढली आहे. वर्ष 2021-22 या मूल्यांकन वर्षात 6.37 कोटी इतकी झाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

 



[ad_2]

Related posts