Horoscope 11 November 2023 : ‘या’ राशींच्या लोकांनी विरोधकांपासून राहावं सावध

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 11 November 2023 : आज शनिवार म्हणजे शनिदेव आणि हनुमानजीची पूजा करण्याचा दिवस. त्यात आज रविवारी दिवाळी आहे. अशातच आजचा दिवशी सगळी खरेदी आणि तयारी करा. त्यामुळे आजचा दिवस तुमच्याासाठी नेमका कसा आहे जाणून राशीभविष्य…

मेष (Aries Zodiac) 

प्रीती, लक्ष्मी योग कामाच्या ठिकाणी अडचणी दूर होतील.  प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही बदल करावे लागणार आहेत. 

वृषभ (Taurus Zodiac) 

कर्जातून मुक्त होण्यासाठी घरातील वरिष्ठ लोकांचा सल्ला घ्या.  व्यवसायाची स्थिती मजबूत होईल. ऑफिसमध्ये चांगल्या कामगिरीमुळे तुम्हाला सरप्राईज मिळेल.

मिथुन (Gemini Zodiac)

सणासुदीच्या काळात व्यवसायात काहीतरी नवीन करण्यात यश येईल.  जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल.

कर्क (Cancer Zodiac)  

व्यवसायातील तुमच्या निष्काळजीपणाचा फटका बसणार आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. 
 

सिंह (Leo Zodiac)

व्यवसायात नफा मिळाल्याने तुमची चिंता कमी होईल. तुमच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. विद्यार्थ्यांना ऑनलाइन काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac) 

अकडलेले पैसे परत मिळणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. कुटुंबासोबत काही आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. 

तूळ (Libra Zodiac)

तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबासोबत दिवस आनंदात जाणार आहे. वैवाहिक जीवनात समस्या दूर होईल. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)

कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या विरोधात कटकारस्थान रचणार आहे. ऑफिसमध्ये वाद होण्याची शक्यता. जोडीदारासोबतही मतभेद होण्याची शक्यता आहे. 

धनु (Sagittarius Zodiac)

तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो.  सामाजिक आणि राजकीय स्तरावर तुमची प्रतिष्ठा वाढेल. 

मकर (Capricorn Zodiac)

तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावरील कामाला गती मिळणार आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणं तुमच्या बाजूने लागणार आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

कामाच्या ठिकाणीतील अडचणी दूर होणार आहे. मोठा वाद मिटवण्यात तुमची महत्त्वाची भूमिका असणार आहे. 

मीन (Pisces Zodiac)

व्यवसायातील नुकसानीची भरपाई न मिळाल्याने तुम्ही तणावात राहाल. त्वचेशी संबंधित काही समस्या उद्भवू शकते. कुटुंबातील घरगुती वादांपासून अंतर ठेवणं तुमच्या हिताचं ठरेल. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts