PM Kisan Samman Nidhi Do This Work Soon Otherwise You Did Not Receive 15th Installment

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Kisan Samman Nidhi Installment: दरवर्षी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निदी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Installment) माध्यमातून सहा रुपयांचा निधी दिला जातो. ही रक्कम प्रत्येक चार महिन्यांच्या फरकारने दोन दोन हजार रुपये दिले जातात. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना (Farmers) 14 हफ्ते मिळाले आहेत. आता 15 वा हफ्ता कधी मिळणार याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, 15 वा हफ्ता मिळवण्यापूर्वी काही महत्वाची कामं करणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचा 15 वा हफ्ता अडकू शकतो.  

15 नोव्हेंबरला 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 

PM किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण जर तुम्ही याशी संबंधित काही महत्त्वाचे काम केले नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकरी बांधवांना मिळाला आहे. आता पंधरावा हप्ता येणार आहे. अर्ज भरताना तुमचे नाव बरोबर लिहावे, बँक खात्यावरील नाव तपासावे. याशिवाय आधार कार्ड क्रमांकाची योग्य माहितीही टाका. फॉर्ममध्ये काही चूक असल्यास हप्ता थांबवला जाईल. त्यामुळं काळजीपूरर्व माहिती भरा. 

शेतकरी बांधव अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांनी PM किसान पोर्टलवर त्यांचे भुलेख क्रमांक, बँक खात्यांचे आधार सीडिंग आणि eKYC पूर्ण करावे. तसे न झाल्यास त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता पीएम किसान सन्मान निधी योजनेतील 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करतील. या कालावधीत संवाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत आठ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ते वर्ग केले जातील.

लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये दर चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. सध्या 14 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतकरी 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील हप्त्यांमध्ये, पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामागचे कारण जमिनीच्या नोंदींची पडताळणी असल्याचे सांगितले जात आहे. पंधराव्या हप्त्यादरम्यानही मोठ्या प्रमाणात अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जाऊ शकतात, असे मानले जात आहे. सरकार या शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी सातत्याने नोटिसा पाठवत आहे. पैसे परत न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

PM Kisan योजनेशी काही अडचण असल्यास

पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. शेतकरी हेल्पलाइन नंबर – 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 वर देखील संपर्क करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या:

PM Kisan : लवकरच मिळणार PM किसानचा 15 वा हफ्ता, त्यापूर्वी करा ‘हे’ काम

[ad_2]

Related posts