Diwali Muhurat Trading 2023 Time Stock Market Bombay Stock Exchange And National Stock Exchange Diwali Trading Detail Latest Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर नॅशनल स्टॉक एक्सेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सेंज (BSE) मुहूर्त ट्रेडिंगसाठी तासभर उघडतात.  15 मिनिटांच्या प्री-मार्केट सत्रासह, संध्याकाळी 6 ते 7.15 यावेळत शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग (Muhurt Trading) पार पडले. त्याच पार्श्वभूमीवर बाजाराने जोरदार सुरुवात केली. सुरूवातीला सेन्सेक्स (Sensex) 350 हून अधिक अंकांनी वाढला आहे. आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बाजारपेठा नफ्याने खुल्या झाल्या.  मुहूर्ताच्या व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांच्या वाढीसह 65,418.98 वर उघडला, तर निफ्टी (NIFTY) देखील 19500 पार करून 19547.25 वर उघडला. त्याचप्रमाणे यंदाच्या मुहूर्त ट्रेडिंगवर गुंतवणूकदारांना देखील जवळपास 2.3 लाख कोटी रुपयांचा नफा झाल्याचं पाहायला मिळालं. 

निफ्टीने देखील जवळपास 121 अंकांच्या वाढीसह व्यवहार करण्यास सुरुवात केली. सेन्सेक्समध्येही चांगली वाढ दिसून आली. त्यामुळे मुहूर्त ट्रेडिंगच्या काळात बाजारात चौफेर खरेदी होत असल्याचं दिसून आलं.  प्री-ओपनिंगमध्ये बाजाराने चांगली सुरुवात केली. बीएसई मिडकॅप 32,888 च्या जवळपास वाढीसह व्यवहार करताना पाहायला मिळालं.

‘या’ वेळेत झाली मुहूर्त ट्रेडिंग

NSE नुसार, मुहूर्त ट्रेडिंग 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 पर्यंत झाले. . 6 ते 6.15 या वेळेत प्री-ओपनिंग झाले. यानंतर 6.15 ते 7.15 पर्यंत सर्वसामान्यांना व्यवहार करता आला. ब्लॉक डील विंडो फक्त 5.45 वाजता उघडली. मुहूर्त ट्रेडिंगचे शेवटचे सत्र 7.25 ते 7.35 पर्यंत झाले. कॉल ऑक्शन इलिक्विड सेशन संध्याकाळी 6:20 ते 7:05 दरम्यान झाले.

हिरव्या निशाण्यावर बंद झाला शेअर बाजार

मुहूर्त ट्रेडिंगच्या कालावधीमध्ये मागील पाच वर्षांपासून सेन्सेक्समध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर यंदाही सेन्सेक्स हिरव्या चिन्हावर बंद झाला आहे. यावेळीही बाजाराची सुरुवात तेजीने झाली. बाजार हिरव्या चिन्हाच्या वाढीसह बंद झाला.च्या वाढीसह बंद झाला. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये मुहूर्ताच्या व्यवहारात सेन्सेक्स अवघ्या एका तासात 524 अंकांच्या वाढीसह बंद झाला होता. तर 2021 मध्ये सेन्सेक्स 296 अंकांच्या वाढीसह बंद झाला.

अनेक मोठे गुंतवणूकदार या मुहूर्त ट्रेडिंगसाठी उपस्थित होते. दिनानाथ दुभाषी L&T फायनन्स सीईओ आणि BSE एम डी सीईओ सुंदररमण राममुर्ती यांच्या हस्ते ट्रेडिंग बेल झाली. गुंतवणूकदारांसाठी आजचं मुहूर्त ट्रेडिंग हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. गुंतवणुकदारांचे केंद्रस्थान असेलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सेंजमध्ये संध्याकाळी 6.15 वाजता ट्रेंडिग बेल झाली. त्यानंतर शुभ मुहर्तावर ट्रेडर्सचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला.  यंदा ट्रेडर सिस्टमवर महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. दीड टक्क्याने वाढ झालेल्या सेन्सेक्स, निफ्टीमुळे ट्रेडर्सने मोठा उत्साहात दिवाळी साजरी केली.

हेही वाचा : 

PM Kisan : पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच मिळणार, त्याआधी करा ‘हे’ काम; नाहीतर होईल 2 हजार रुपयांचं नुकसान

[ad_2]

Related posts