Crime News Death In Car But Lived After 17 Years In Gujarat

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

गुजरात : रोज अनेक गंभीर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खुनाच्या (Murder) घटना समोर येत असतात. पण कधी-कधी गुन्हेगारीच्या जगातून आश्चर्यचकित करणाऱ्या बातम्या देखील समोर येतात. गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) क्राइम ब्रँचने अशाच एका प्रकरणाचा खुलासा केला आहे. 17 वर्षांनंतर एक मृत व्यक्ती चक्क जिवंत झाल्याने पोलिसांना देखील धक्का बसला. मात्र, याच प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केल्यावर एखांद्या क्राईम सिरीयलला देखील लाजवेल अशी खरोखरची क्राईम स्टोरी समोर आली आहे. ज्यात एका खुनाचा उलगडा झाला आहे. 

काय आहे प्रकरण? 

17 वर्षांपूर्वी म्हणजेच 31 जुलै 2006 रोजी उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यात एक अपघात झाला होता. याच अपघातात एका व्यक्तीचा कारमध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला होता. अनिल सिंग असे या व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे, मयत अनिल सिंगच्या नावावर 80 लाख रुपयांचा जीवन विमा होता. त्यामुळे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या मृत्त्यूनंतर विमा कंपनीत दावा करून 80 लाख रुपये वसूल केले. पण आता 17 वर्षांनी अनिल सिंग जिवंत असल्याचे समोर आले आहे. तसेच, या संपूर्ण कटाचा सूत्रधार देखील अनिलचं असल्याचे समोर आले आहे. मात्र, याच बरोबर या प्रकरणात एक खुनाच्या घटनेचा देखील खुलासा झाला असून, याचा देखील मास्टरमाइंड अनिल सिंग आहे.  

असा रचला कट? 

2004 मध्ये अनिल सिंगने आपल्या कुटुंबाच्या मदतीने एलआयसीकडून विम्याचे पैसे लाटण्याचा कट रचला. यासाठी अनिलने स्वतःचा 80 लाख रुपयांचा जीवन विमा उतरवला. त्यानंतर त्याने 2006 मध्ये स्वत:ला मृत दाखवण्यासाठी त्याने एक प्लॅन बनवला. आग्रा टोल टॅक्सजवळ असलेल्या एका भिकाऱ्याला जेवण देण्याच्या बहाण्याने आपल्या कारमध्ये बसवले. त्यानंतर त्याला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले. भिकारी बेशुद्ध होताच अनिल आणि त्याच्या कुटुंबीयांनी भिकाऱ्याला गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवून गाडी पेटवून दिली. ज्यात त्याचा होरपळून मृत्यू झाला. 

ओळख लपवण्यासाठी कागदपत्रेही बनावट नावाने तयार केली…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विम्याच्या रकमेचा अपहार करण्याच्या कट अनिल सिंगसह त्याचे वडील आणि भावाने रचल्याचे उघड झाले आहे. याबाबत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. विशेष म्हणजे भिकाऱ्याची हत्या केल्यावर विम्याचे पैसे लाटून, अनिल सिंगने अहमदाबादमध्ये सर्वांना आपले नाव राजकुमार असल्याचे सांगितले. तसेच त्याने सर्व आवश्यक कागदपत्रेही बनावट नावाने तयार केली. ज्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आणि पॅन कार्ड समावेश आहे. त्यामुळे अहमदाबाद पोलिसांनी बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलं आहे. सोबतच आग्रा पोलीस देखील भिकाऱ्याच्या हत्येचा गुन्हा दाखल करणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Bhiwandi : पत्नीसोबत फोनवर बोलला म्हणून केली हत्या, पत्नीलाही मारण्यास निघाला पण पोलिसांच्या तावडीत सापडला

[ad_2]

Related posts