Delhi Air Quality Is Poor Due Pollution On Diwali Firecrackers Were Busted A Lot Despite Ban From Supreme Court Latest Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Firecrackers Ban In Delhi : दिल्ली (Delhi) आणि एनसीआरमध्ये दिवाळीत फटाक्यांवर बंदी (Firecrackers Ban) असतानाही मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी (Firecrackers)  करत नियम धाब्यावर बसवण्यात आले. दिवाळी (Diwali 2023) हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. दिवाळीत घरोघरी रांगोळी काढली जाते आणि आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांची आतषबाजीही (Diwali Firecrackers) केली  जाते. मात्र, दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिवाळीत फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. एखाद्या व्यक्तीने फटाके फोडल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. असं असलं तरी, दिल्लीतील नागरिकांनी मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवला. दिल्लीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले.

दिवाळीच्या आधीच दिल्लीमध्ये प्रदूषणात प्रचंड वाढ झाली होती. दिल्ली एनसीआरमधील प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली होती, मात्र त्यानंतरही दिवाळीत अनेक भागात फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी वाढली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत ते कमीच राहिले.

दिल्लीकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर

रविवारी, 12 नोव्हेंबरला ल्क्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच अनेक भागात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली, त्याचं प्रमाणे संध्याकाळपर्यंत वाढत गेले. इतकंच नाही तर, अगदी मध्यरात्रीपर्यंत फटाके फोडण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. काही सेकंदांच्या अंतराने 90 डेसिबलची आवाज मर्यादा ओलांडणाऱ्या फटाक्यांचा आवाज रात्री 10 वाजेपर्यंत दिल्लीत जवळपास प्रत्येक भागासह ऐकू येत होता.

दिल्लीत कुठे आणि किती प्रदूषण?

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे दिल्लीतील प्रदूषणातही अनेक पटींनी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवेची पातळी घसरली होती, आता फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता आणखी घसरली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI-Air Quality Index) 296 होता, ही आकडेवारी सामान्यपेक्षा सहापट जास्त आहे. CPCB – PM 2.5 नुसार, लोनी गाझियाबादमध्ये सकाळी 6 वाजता AQI (Air Quality Index) 414 होता, तर नोएडा सेक्टर 62 मध्ये AQI 488, पंजाबी बाग – 500 आणि रोहिणीमध्ये AQI 456 होता.

 

 



[ad_2]

Related posts