Uttarkashi Uttarkashi Tunnel Rescue 41 Workers Trapped Finally Freed After 17 Days Latest Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते, त्यांची 17 दिवसांनी सुटका करण्यात आली. बोगद्यात अडकलेल्या या कामगारांची सुटका झाली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिकांचा ताफा आणि तात्पुरतं रुग्णालय सज्ज ठेवण्यात आलं आहे. 

गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं. उत्तरकाशीतील (Uttarkashi) सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) 41 कामगार अडकल्याने देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या होत्या.

 

सुरुवातीला दोन मजुरांना बाहेर काढलं, तात्पुरतं रुग्णालय तयार

तब्बल 17 दिवसांनी या 41 कामगारांना बाहेर काढण्यात आलं. सुरुवातीला दोन कामगांरांना बाहेर काढण्यात आलं आणि नंतर इतरांनाही बाहेर काढण्यात आलं. या बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरतं रुग्णालय तयार ठेवण्यात आलं. तसेच या ठिकाणी अँब्युलन्सही तयार ठेवण्यात आली होती. बांधकामाच्या ठिकाणाहून मुख्य रुग्णालय हे 30 किमीच्या अंतरावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी बांधकामाच्या ठिकाणीच तात्पुरत्या रुग्णालयाची सोय करण्यात आली. 

12 नोव्हेंबरची पहाट, सूर्याचं डोकं नुकतंच वर येत होतं, हाडं गोठवणाऱ्या थंडीत उत्तरकाशीत कामगार बोगदा खणण्याचं काम करत होते. मात्र त्याचवेळी बोगद्याचा काही भाग कोसळला आणि अवाढव्य बोगदा निर्माण करणारे शिल्पकार त्यात अडकले होते. या कामगारांच्या सुटकेसाठी संपूर्ण देश आतूर झाला होता. या घटनेला आता 17 दिवस झालेत. प्रचंड कष्ट, अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने या कामगारांसाठी अन्न-पाणी, मोबाईल, तणाव कमी करण्यासाठीच्या वस्तू पाठवण्यात आल्या, आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. 

कामगारांच्या सुटकेसाठी देशभरातील विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO), नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NHIDCL), जे प्रकल्प बांधत आहेत आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP-Indo Tibetan Border Police) यासह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी आहेत.



[ad_2]

Related posts