North Goa Vs South Goa Which Place Is The Best For Tourist Places To Explore In Goa A To Z Details Of South Goa And North Goa

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

North Goa Vs South Goa : गोवा… नाव ऐकताच डोळ्यासमोर येतात ते निळेशार लांबच लांब पसरलेले समुद्रकिनारे (Goa Beaches), मस्त रंगेबिरंगी आणि वेस्टर्न कपडे परिधान केलेले देश-विदेशी पर्यटक आणि खाद्यपदार्थांसह स्वस्त मद्याचा आस्वाद घेण्याची कल्पना. अनेकांनी निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि पारंपरिक संस्कृतीने नटलेल्या अशा या ठिकाणाला भेट दिली असेल, तर कित्येक ग्रुपच्या फक्त प्लॅनमध्येच अजून गोव्याला जाणं अडकलं असेल.

गोवा हे राज्य अगदी छोट्या-छोट्या पैलूंनी नटलेलं आहे. गोवा (Goa) हे इतकं मोठं राज्य नसलं तरी गोव्याला समजून घेण्यासाठी, गोव्याची संस्कृती जाणून घेण्यासाठी, त्याची चव चाखण्यासाठी अगदी आठवडाभराचा कालावधी देखील कमी पडेल. त्यात गोवा हे विभागलं आहे दोन भागात, एक म्हणजे उत्तर गोवा (North Goa) आणि दुसरं म्हणजे दक्षिण गोवा (South Goa). आता या दोन्ही भागांमधून नेमकं राहायला जावं तरी कोणत्या भागात? असा प्रश्न गोव्याला भेट देण्याआधी, गोव्याला जायचं नियोजन करण्याआधी अनेकांना पडतो आणि अर्थातच, तुम्हाला खरंच तुमची सुट्टी आनंदात घालवायची असेल तर गोव्याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेणं भाग आहे. यासाठीच आज थोडक्यात गोव्याच्या दोन्ही भागांविषयी माहिती घेऊया.

उत्तर गोवा की दक्षिण गोवा? (North Goa or South Goa?)

गोव्याला भेट देण्याआधी काही गोष्टी लक्षात घ्या. पहिलं म्हणजे, उत्तर गोवा (North Goa) आणि दक्षिण गोवा (South Goa) हे एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. अगदी माणसांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच गोव्याचं दोन भागात विभाजन झालं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. उत्तर गोवा हे गर्दीचं ठिकाण आहे, तर दक्षिण गोव्यात फारच कमी गर्दी असते. उत्तर गोव्यात पार्टी आणि गोंधळ असतो, तर दक्षिण गोव्यात खूपच शांतता असते. तुम्ही अ‍ॅडव्हेंचरचे शौकीन असाल तर तुम्ही उत्तर गोव्याला (North Goa) जावं, इथे गजबजलेल्या बाजारपेठा आणि समुद्रकिनारे आहेत, पण तुम्हाला शांत ठिकाण आवडत असेल तर तुम्ही दक्षिण (South Goa) गोव्याला भेट द्यावी.

तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोव्याला भेट देऊ शकता. 

तुम्हाला गोव्याकडे काय आकर्षित करतं?

  • पार्टी, नाईटलाईफ, चर्च = उत्तर गोवा (North Goa)
  • शांत समुद्रकिनारे, निसर्ग = दक्षिण गोवा (South Goa)

पार्टी प्रेमींसाठी उत्तर गोवा चांगला पर्याय (North Goa is for Party Animals)

उत्तर गोव्याला जायचं की दक्षिण गोव्याला जायचं? हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, पण जर तुम्ही पार्टी प्रेमी (Party Lovers) असाल आणि तुम्हाला पार्टीचं वातावरण, गजबजलेले समुद्रकिनारे, गाण्यांची मैफल (Music and Live Concerts) आणि ऐशोआरामाची नाईटलाईफ (Nightlife) हवी असेल तर उत्तर गोव्याला जाणं हा योग्य निर्णय असेल. नाईटलाईफ एन्जॉय करण्यास उत्तर गोवा (North Goa) हा चांगला पर्याय आहे. अगदी मध्यरात्री देखील तुम्हाला येथील हॉटेल आणि रस्ते पर्यटकांनी गजबजलेले दिसतील. जे लोक अतिउत्साही आहेत, ज्यांना पार्टीची, नाचगाण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी इकडचे नाईट क्लब्स (Night Clubs), हॉटेल्स (Hotels), क्रूझ (Cruise), कसिनो (Casino) हे उत्तम पर्याय आहेत. टीटोज् (Tito’s Club) आणि थलासा (Thalassa Club) हे उत्तर गोव्यातील प्रचलित क्लब आहेत.

शांतता प्रिय लोकांसाठी दक्षिण गोवा उत्तम पर्याय (South Goa is Best for Peace Loving People)

ज्यांना शांत समुद्रकिनाऱ्यांसह निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी दक्षिण गोवा (South Goa) सर्वोत्तम आहे. दक्षिण गोव्याला रहदारी अजिबात नसते, येथील समुद्रकिनारे देखील गजबजलेले नसतात. समुद्रकिनाऱ्यांवर फक्त लाटांचा खळाळणारा आवाज आणि त्याला लागून नटलेले हिरवेगार डोंगर. शांतता प्रिय लोकांसाठी दक्षिण गोवा (South Goa) खरंच खूप उत्तम आहे. शांत समुद्रकिनारे, लक्झरी रिसॉर्ट्स आणि निसर्गाशी जोडण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर दक्षिण गोवा (South Goa) हे एक पाहण्यासारखं ठिकाण आहे. येथे फारशा हॉटेलचा गजबजाट देखील नाही. संध्याकाळी 7 नंतर अगदी शांतता पसरलेली दिसते, अशात रात्री समुद्रकिनाऱ्यांलगत चालण्याचा अनुभव अगदी शब्दातही न मांडता येण्यासारखा आहे. अगोंडा (Agonda) आणि पालोलेम (Palolem) ही दक्षिण गोव्यातील प्रमुख ठिकाणं आहेत. गोव्याबद्दल सविस्तर सोप्या मुद्द्यांत जाणून घेऊया.

गोव्याच्या उत्तर भागात अनुभवण्यासारखं काय? 

समुद्रकिनारे (North Goa Beaches)

काहींना सुट्ट्यांमध्ये डोंगरावर जायला आवडतं (Mountain Person), तर काहींना समुद्रकिनाऱ्यावर (Beach Person) फिरायला आवडतं. जर तुम्हाला समुद्र (Beach) आवडत असतील तर तुम्ही उत्तर गोव्याला जाण्याचा विचार करावा. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर तुम्हाला अनेक परदेशी पर्यटकांची रेलचेल देखील दिसेल. 

उत्तर गोवा त्याच्या चैतन्यशील आणि गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. उत्तर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर बरेच ओपन हॉटेल्स असतात, ज्यांच्या बाहेरच वाळूत शॅक्स (Goa Shacks) ठेवलेले असतात, ज्यावर झोपून आरामात तुम्ही शीतपेय पित, खाद्यपदार्थ खात वातावरणाचा आनंद घेऊ शकता. उत्तर गोव्यातील बीचवर तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत सूर्यास्ताची सुंदर दृश्यंही पाहता येतील, ज्यामुळे तुमची सहल आणखी अविस्मरणीय होईल.

उत्तर गोव्यात भेट देण्यासारखे समुद्रकिनारे : कलंगुट बीच, बागा बीच, अंजुना बीच, कंडोलिम बीच, वॅगेटर बीच, मिरामर बीच.

नाईटलाईफ (North Goa Nightlife)

उत्तरेकडील गोव्याचा भाग हे गोव्याचं पार्टी केंद्र (Goa Party Hub) आहे, येथील अनेक क्लब, बार आणि समुद्रकिनाऱ्यांवर रात्रभर पार्ट्या होतात. तुम्हाला रात्री उशिरापर्यंत पार्टी करायला आवडत असेल तर तुम्ही या भागात जाऊन नाईट लाईफचा आनंद घेऊ शकता. बीच पार्टीसाठी विशेषत: अंजुना (Anjuna Beach), वॅगेटर (Vagator Beach) आणि बागा (Baga Beach), कलंगुट (Calangute Beach), कंडोलिम (Candolim Beach) त्यांच्या नाईटलाईफसाठी ओळखले जातात आणि जगभरातील पक्षांना आकर्षित करतात. या बीचच्या आजूबाजूला तुम्हाला अनेक टॅटूची दुकानं, गजबजलेल्या आकर्षक वस्तूंच्या बाजारपेठा देखील दिसतील.

साहसी उपक्रम (North Goa Adventurous Water Sports)

गोव्याचा उत्तर भाग साहसी जलक्रिडांसाठी (Water Sports) खूप प्रसिद्ध आहे आणि भारतातील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला साहस आवडत असेल तर गोव्याचा उत्तर भाग तुमच्यासाठी उत्तम ठरेल. तुम्हाला अनेक साहसी वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव येथे घेता येईल.

गोव्याच्या उत्तरेकडील भागात बागा, कलंगुट बीचवर सी सर्फिंग, बनाना राईड, स्नॉर्केलिंग, पॅरासेलिंग आणि पॅराग्लायडिंग, स्कूबा डायव्हिंग, जेट स्की आणि अनेक साहसी खेळांचा आनंद तुम्ही घेऊ शकतो. तुम्हाला तुमच्या नवीन वर्षाच्या सुट्ट्या आणि गोव्याची सहल साहसाने भरलेली हवी असेल, तर तुम्ही हे उपक्रम नक्कीच अनुभवा. सर्व प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर तुम्हाला याचा आनंद घेता येईल. बऱ्याच ठिकाणी या सर्व खेळांचं चांगलं एकत्रित पॅकेज देखील ऑफर केलं जातं.

स्थानिक बाजारात खरेदी (North Goa Flea Market)

उत्तर गोव्यातील फ्ली मार्केट, विशेषत: अंजुना फ्ली मार्केट (Anjuna Flea Market) आणि अर्पोरा येथील शनिवारी रात्रीचे फ्ली मार्केट (Saturday Night Market Arpora) पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. या बाजारपेठांमध्ये आकर्षक कपडे, शो पिस आणि हस्तकला यासह विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री होते. उत्तर गोव्याच्या अगदी प्रत्येक भागात तुम्हाला या वस्तूंची विक्री करणारी आकर्षक दुकानं आणि स्टॉल्स दिसतील. कलंगुट (Calangute Market), बागा (Baga Market) समुद्रकिनाऱ्याच्या भागात देखील तुम्हाला सुंदर फ्ली मार्केटचा अनुभव घेता येईल. तुम्ही शॉपोहोलिक (Shopaholic) असाल, वस्तू खरेदी करण्याची तुम्हाला आवड असेल तर या भागांना नक्कीच भेट द्या.

तुम्ही हे किल्ले देखील पाहू शकता (North Goa Forts)

उत्तर गोवा या भागात अनेक जुने किल्ले आहेत, जे एकदा पाहायलाच हवेत. या किल्ल्यांमध्ये अगुडा किल्ला (Aguada Fort) आणि चापोरा किल्ला (Chapora Fort) या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे. यातील चापोरा फोर्ट हा ‘दिल चाहता है’ (Dil Chahta Hai) या चित्रपटामुळे जास्त प्रचलित आहे. दोस्ती, यारीवरील या चित्रपटामुळे गोव्यात फिरायला आलेल्या मित्रमंडळींची पावलं या किल्ल्याकडे (Chapora Fort) वळतातच.

उत्तर गोव्यातील चर्च (North Goa Churches)

उत्तर गोव्याचा प्रत्येक भाग हा सुंदर आणि आकर्षक चर्चने नटलेला आहे. पांढरे शुभ्र चर्च पाहून अगदी कोणाच्याही मनाला भुरळ पडेल आणि मन शांत होईल. फोटो काढण्यासाठी अनेक पर्यटक या चर्चच्या बाहेर रेलचेल करतात. जुन्या गोव्यात (Old Goa) असलेलं द बॅसिलिका ऑफ बॉम जिझस (The Basilica of Bom Jesus) हे गोव्यातील ऐतिहासिक चर्च आहे. यासह खालील दिलेले अनेक चर्च गोव्याचे लोकप्रिय चर्च आहेत.

  • द चर्च ऑफ अवर लेडी ऑफ द रोझरी (The Church of Our Lady of The Rosary)
  • से कॅथेड्रल (Se Cathedral)
  • चर्च ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन ऑफ द व्हर्जिन मेरी (Church of the Immaculate Conception of the Virgin Mary)
  • चर्च ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट (Church of Our Lady of the Mount)

उत्तर गोव्यातील डिनर क्रुझ अनुभव (Panaji Dinner Cruise Experience)

तुम्ही दुपारी जुना गोवा (Old Goa) आणि तेथील चर्च (Church), फॉन्टेन्हास (Fontainhas) या रंगीत इमारतींच्या भागात फिरू शकता आणि त्यानंतर संध्याकाळी पणजी जेट्टीत येऊन क्रूझ बोटींचं तिकीट काढू शकता. संध्याकाळी 7 वाजल्यापासून या क्रूझ सुरू होतात. दोन तासांसाठी या बोटींवर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं. यावर तुम्ही लाईव्ह डीजे, विविध खेळ, गोव्याच्या शैलीतील नृत्य आणि स्वादिष्ट पदार्थ आणि मद्याचा आनंद घेऊ शकता.

उत्तर गोव्यातील प्रेक्षणीय ठिकाणं (North Goa Places to Visit)

  • फॉन्टेन्हास (Fontainhas)
  • जुना गोवा (Old Goa)
  • पर्रा रोड (Parra Coconut Tree Road)
  • डोना पॉला (Dona Paula Beach)
  • कळंगुट (Calangute Beach)
  • कंडोलिम (Candolim Beach)
  • बागा (Baga Beach)
  • मिरामर (Miramar Beach)
  • चापोरा किल्ला (Chapora Fort)
  • अगुडा किल्ला (Aguada Fort)
  • अंजुना फ्ली मार्केट (Anjuna Flea Market)
  • टिटोज् लेन (Tito’s Lane)
  • थलासा क्लब (Thalassa Club)
  • कसिनो, पणजी (Casinos, Panaji)

उत्तर गोव्यात कसं पोहोचाल? (How to reach North Goa?)

जर तुम्ही ट्रेनने गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला थिविम रेल्वे स्थानकावर उतरावं लागेल, त्यानंतर बाहेर तुम्हाला टॅक्सीचा पर्याय उपलब्ध असेल. तुम्ही कंडोलिम, कलंगुट किंवा बागामध्ये एखादं हॉटेल बुक करुन राहू शकता. विमामाने प्रवास करणाऱ्यांना चिपी विमानतळ जवळ पडेल, त्यानंतर टॅक्सी किंवा कॅबचा पर्याय उपलब्ध असेल.

गोव्याच्या दक्षिण भागात अनुभवण्यासारखं काय? 

गोव्याचा दक्षिण भाग हा गजबजलेल्या उत्तरेकडील भागाच्या तुलनेत अधिक प्राचीन आणि नैसर्गिक लँडस्केपसाठी, शांत निसर्गासाठी ओळखला जातो. दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारे फार स्वच्छ, निळेशार आणि मनाला शांति देणारे असतात, हेच जर तुम्ही उत्तरेकडील समुद्रकिनारे पाहिले तर ते अस्वच्छ आणि काळ्या पाण्याचे असल्यासारखेच वाटतात.

शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे (Peaceful and Clean Beaches)

दक्षिण गोवा त्याच्या शांत आणि कमी गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारे हे फार स्वच्छ आणि निळेशार असतात. पालोलेम (Palolem Beach), अगोंडा (Agonda Beach) आणि कोल्वा (Colva Beach), कोला (Cola Beach) सारख्या समुद्रकिनाऱ्यांवर खूप शांत वातावरण आहे. विश्रांती आणि एकांतासाठी हे समुद्रकिनारे उत्तम आहेत.

दक्षिण गोव्यात कायाकिंग देखील प्रसिद्ध आहे. कोला बीचवर तुम्हाला कायाकिंगचा अनुभव घेता येतो. कायाकिंगमध्ये तुम्हाला एक छोटी बोट दिली जाते आणि डबल ब्लेडेड पेडल दिलं जातं, जे पाण्याच्या विरुद्ध दिशेला मारुन बोट पुढे न्यायची असते. यासाठी जवळपास 1 तासाचे 100 रुपये प्रतिव्यक्ती आकारले जातात.

उत्तर गोव्यात भेट देण्यासारखे समुद्रकिनारे : पालोलेम बीच, अगोंडा बीच, कोल्वा बीच, कोला बीच, बटरफ्लाय बीच, गल्गीबाबा बीच.

मनात भरणारं बटरफ्लाय बीच (Butterfly Beach, South Goa)

दक्षिण गोव्याचा एकदम सु्ंदर, अस्पर्शित आणि निळाशार समुद्रकिनारा म्हणजे बटरफ्लाय बीच (Butterfly Beach). हा समुद्रकिनारा काही वर्षांपूर्वी कुणालाच माहीत नव्हता. परंतु त्यानंतर इन्स्टाग्राम रील्स आणि इतर समाजमाध्यमांमुळे हा अगदी सर्वांना अवगत झाला. पर्यटकांची रेलचेल नसल्याने आणि पोहोचण्यासाठी तसा अवघड असल्याने हा समुद्रकिनारा फार सुंदर आहे. येथील वाळू ही शंख, शिंपल्यांनीच भरलेली आहे, त्यामुळे येथील पाणी देखील पारदर्शक आहे. या समुद्रकिनाऱ्याला भेट दिल्यावर अगदी परदेशात आल्यासारखंच वाटतं. जर तुम्हाला एकांत हवा असेल तर यापेक्षा चांगली जागा क्वचितच कुठे असेल. येथे पोहोचण्यासाठी बोट किंवा जीप हे दोन पर्याय आहेत. अन्यथा अर्धा रस्ता स्कुटी आणि पुढे 10 मिनिट चालत देखील तुम्ही येथे पोहोचू शकता.

लक्झरी रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स

गोव्याचा दक्षिण भाग हा काही उत्तम लक्झरी रिसॉर्ट्स आणि हॉटेल्ससाठी ओळखला जातो. सामान्य जीवनापासून काही दिवस दूर लक्झरी लाईफचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्हाला दक्षिण गोव्यातील महागडे रिसॉर्ट्स नक्कीच आवडतील. यासोबतच समुद्राला लागून असणारे कॉटेज (Beach Front Cottages) देखील तुमच्या मनाला भुरळ घालतील. या कॉटेजमध्ये राहण्याचा आनंद काही औरच असतो. सकाळी उठताच समोरच दिसणारा समुद्र, खळाळणाऱ्या लाटा पाहूनच मन प्रसन्न होतं.

रोमँटिक अनुभव (Romantic Experience)

गोव्याचा दक्षिण भाग शांत आणि पौराणिक असल्यामुळे या ठिकाणी बहुतेक जोडपी येतात. समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताला फेरफटका मारणे आणि कँडललाइट डिनर हे देखील दक्षिण गोव्यात अनुभवण्यासारखं आहे. एकांतासाठी बरेच जोडपी येथे येतात. वाढदिवस किंवा खास दिवस साजरे करण्यासाठी जोडप्यांची दक्षिण गोव्याला पसंती असते. एकूणच दक्षिण गोव्यातील अद्भूत शांतता आणि सौंदर्य प्रत्येकालाच भुरळ घालते.

दक्षिण गोव्यातील प्रेक्षणीय ठिकाणं (South Goa Places to Visit)

  • काबो दे रामा फोर्ट (Cabo De Rama Fort)
  • कोला बीच (Cola Beach)
  • अगोंडा बीच (Agonda Beach)
  • पालोलेम बीच (Palolem Beach)
  • कोल्वा बीच (Colva Beach)
  • बटरफ्लाय बीच (Butterfly Beach)

(Cabo De Rama Fort and Beach)

दक्षिण गोव्यात कसं पोहोचाल? (How to reach South Goa)

ट्रेनने (Train) गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर मडगाव (Madgaon) या रेल्वे स्थानकावर उतरा, त्यानंतर मडगाव स्थानकाबाहेरुन काणकोणला (Canacona) जाणारी बस (Bus) तुम्हाला उपयुक्त ठरेल. अन्यथा मडगाव रेल्वे स्थानकावरुन (Madgaon Railway Station) टॅक्सी करुन तुम्ही अगोंडा किंवा पालोलेम येथे पोहोचू शकता. विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी दक्षिण गोवा थोडं लांब पडेल, तरी विमानतळाबाहेरुन तुम्ही टॅक्सी (Taxi) किंवा कॅबने (Cab) अगोंडा (Agonda) किंवा पालोलेम (Palolem) येथे पोहोचू शकता, एखादं छान हॉटेल ऑनलाईन बुक करुन सुट्टी एन्जॉय करू शकता.

हेही वाचा:

Tourism: केरळमधील ‘ही’ 10 सुंदर ठिकाणं तुमचं मन मोहून टाकतील; एकदा हे फोटो पाहाच

[ad_2]

Related posts