[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Kalyan Jewellers : उद्योजक टी.एस कल्याणरामन यांच्या आत्मचरित्राचं अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अनावरण कल्याण ज्वेलर्सचे संस्थापक प्रतिष्ठित उद्योगपती टी.एस. कल्याणरामन यांच्या द गोल्डन टच या आत्मचरित्राचे मुंबईत बॉलीवूड मेगास्टार आणि कल्याण ज्वेलर्सचे ब्रँड अॅम्बेसेडर – अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. अनावरण समारंभाचा एक भाग म्हणून, श्री टी एस कल्याणरामन यांनी बहुप्रतिक्षित आत्मचरित्राची पहिली प्रत्र आयकॉनिक सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना भेट दिली.
त्रिशूरमधील सुरुवातीपासून ते देशातील सर्वात मोठ्या ज्वेलरी चेनची स्थापना करण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात केवळ उधृत केलेला नाही तर यामध्ये आकांक्षापूर्तीच्या आणि ध्येयाच्या दृष्टीने केलेल्या वाटचालीत आव्हानांचा सामना करत नवउन्मेशी वृत्तीने केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आहे.
पुस्तकाबद्दल बोलताना महान अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले, “मला वाटतं, स्वामी (टीएस कल्याणरामन) आज स्टार्ट-अपसाठी आहेत, जे आदि शंकराचार्य अद्वैतसाठी होते. कल्याण ज्वेलर्सची कथा आणि स्वामींचे जीवन अगदी अविभाज्य आहे. केवळ दूरदृष्टी, ध्येय, विश्वास, दृढनिश्चय आणि काही कठीण परिस्थितीत आवश्यक चिकाटी यासाठीचा वस्तुपाठ असलेले हे पुस्तक आज स्टार्ट-अप्सच्या जगात प्रवेश करणाऱ्या उद्योजकांसाठी उत्तम आदर्श आहे.”
[ad_2]