Agriculture News Farmers Success Story Of Jalaun Farmer Ajit Pratap Left Job In Germany Now Earn 5 Crores From Pea Cultivation  Uttar Pradesh News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Success Story: आज भारतात (India) असे अनेक तरुण आहेत की ज्यांनी उच्च शिक्षण घेतलं आहे, पण ते शेती करत आहेत. परदेशात नोकरी करण्याऐवजी हे तरुण शेती करुन ग्रामीण अर्थव्यवस्था (Rural Economy) वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. तर काही तरुण परदेशातील भरभक्कम पगाराची नोकरी सोडून उत्तम प्रकारची शेती करत आहेत. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. या तरुणाने जर्मनीतील नोकरी सोडून वाटाणा शेती सुरु केली आहे. या शेतीतून हा तरुण 5 कोटी रुपयांची आर्थिक कमाई करत आहे. अजित प्रताप (Ajit Pratap) असे उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील यशस्वी शेतकऱ्याचे नाव आहे. 

अजित प्रताप यांनी जर्मनीमध्ये काम केल्यानंतर, भारतात येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. आज अजित प्रताप वाटाणा उत्पादन करुन करोडो रुपयांचा नफा कमवत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर शेतकरीही आता बागायती पिके घेत आहेत. अजित या वाटाणा उत्पादक शेतकऱ्याने सांगितले की, IIIBM इंदूर येथून एमबीएचे शिक्षण घेतले, त्यानंतर त्याने जर्मनीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम केले.

5 एकर जमिनीवर वाटाणा लागवड 

आम्ही मार्केटिंग लाइनशी निगडीत होतो, पण जर्मनीत काम करत असताना मला वाटलं की, आपण करत असलेले काम पाहता आपल्या देशासाठी काहीतरी नवीन का करू नये. याच विचाराने आमी भारतात आलो. गावात आल्यानंतर येथील शेतकरी ओसाड जमिनीवर जवसाची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत असल्याचे त्यांनी पाहिले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने वाटाणा लागवड करण्याचा निर्णय घेतला. आज सुमारे 25 एकर जमिनीवर वाटाणा लागवड केली आहे. न्यूझीलंड आणि इतर काही देशांतून वाटाणा बियाणे आणले आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शेती सुरू केली. आज वाटाणा लागवड आणि बियाणे उत्पादनातून वार्षिक 5 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

बांगलादेश, युरोप आणि नेपाळसारख्या देशामध्ये वाटाण्याची निर्यात

शेतीसोबतच मटारची प्रतवारी, प्रक्रिया आणि पॅकेजिंगसाठी दोन युनिट्स उभारुन काम सुरु केल्याची माहिती अजित प्रताप यांनी दिली. आज आपल्या शेतातील वाटाणा देशभरात पुरवठा केला जातो. त्याचबरोबर बांगलादेश, युरोप आणि नेपाळसारख्या अनेक देशांमध्ये पाठवले जात आहे. त्यामुळे गावातील अनेक शेतकरी आणि मजुरांना रोजगारही मिळाला आहे. अजित प्रताप यांच्या प्रेरणेने आज जालौन येथील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर वाटाणा पिकवून चांगले पैसे कमवत आहेत. अजित प्रताप यांनी सांगितले की, एका एकरात वाटाणा पिकवण्यासाठी 15 हजार रुपये खर्च येतो. यामध्ये अंदाजे 80 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सध्या ते मटारचे गुच्छ बनवून शेती करत आहेत. त्यामुळं पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते.

हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात वाटाण्याला चांगली मागणी

भारतात हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात वाटाण्याला चांगली मागणी असते. त्यामुळं लोक ऑफ सीझनमध्ये गोठवलेल्या मटारचा व्यवसाय करून चांगला नफा कमावतात. त्यांनी सांगितले की, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकरी वाटाणा लागवडीसाठी पीएसएम-३ आणि एपी-३ वाणांची पेरणी करून चांगले उत्पादन घेऊ शकतात. पेरणीनंतर ४३ दिवसांत या वाणांचे उत्पादन सुरू होते. अशाप्रकारे 1 हेक्‍टरपासून 20 क्विंटलपर्यंत उत्पादन आणि 1 एकरापासून दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. सध्या अजित प्रताप यांनी परदेशातील नोकरी सोडून भारतात येऊन शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. ज्याची शेतकऱ्यांमध्ये रोज चर्चा होते.

महत्त्वाच्या बातम्या:

33 वर्षाच्या तरुणाचा पराक्रम!  3 वर्षे  शेती करुन उभारली 1200 कोटींची कंपनी; जाणून घ्या सविस्तर माहिती

[ad_2]

Related posts