Shahapur Mumbai Minister Chhagan Bhujbal Visit To OBC Protest Said That Is Why  the Central Government Does Not Conduct A Caste Wise Census Of OBC Detail Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

शहापूर : ओबीसी (OBC) जनगणना झाल्यास केंद्र सरकारला (Central Government) हजारो कोटी रुपये द्यावे लागतील म्हणून जनगणना करत नसल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलाय.  मागील पाच दिवसांपासून शहापुरातमध्ये ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आमरण उपोषण सुरु होते. दरम्यान या  उपोषणाची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्याने गुरुवार 30 नोव्हेंबर रोजी प्रमुख बाजारपेठा बंद ठेवून या उपोषणाला समर्थन देण्यात आलं. दरम्यान  या उपोषणास  पाचव्या दिवशी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील भेट दिली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणामध्ये वाटा पडू देणार नाही, असं आश्वासन दिलं.

तसेच येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात  विधानसभेत जातनिहाय जनगणना करण्यात यावी असा ठराव मंजूर करून घेऊ विश्वास देखील त्यांनी दिला. त्याच पार्श्वभूमीवर उपोषण करते भरत निश्चिते यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या हातून सरबत पिऊन उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु जर हिवाळी अधिवेशनात जातनिहाय जनगणनेचा ठराव घेण्यात आला नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचं भरत निश्चिते यांनी स्पष्ट केलं. 

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसीसह सर्वांची जनगणना करण्यात यावी,सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये,शाळांच्या खाजगीकरणाचा जीआर रद्द करावा अशा अनेक मागण्यांसाठी हे उपोषण सुरु होते. दरम्यान शहापुरातील वालशेत गावी भरत निश्चिते हे संविधान दिनी आमरण उपोषणासाठी बसले. त्यातच गुरुवार 30 नोव्हेंब रोजी या उपोषणाचा पाचवा दिवस होता. या उपोषणाला अनेक सामाजिक संघटनांनी समर्थन देखील दिलं होतं. तसेच या ठिकाणी मंत्री छगन भुजबळांसह आमदार 

आमच्या ताटात वाटा होऊ देणार नाही – छगन भुजबळ

छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटलं की,  मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु आमच्या ताटात तुम्ही वाटा घालू नका. तुम्ही आम्हाला बघू नका जर आम्ही तुम्हाला बघायला गेलो तर काय होईल लक्षात ठेवा.  तसेच जरांगे यांची नक्कल करत भुजबळांनी चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की,  ओरिजनल कुणबी कोण आणि डुबलीकेट कुणबी कोण याची चौकशी झाली पाहिजे .  या महाराष्ट्राने खूप दादागिरी पाहिली आहे ओबीसी समाज म्हणजे रडणारी जात नाही लढणारी जात आहे. ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना व्हायला हवी आणि ती झाली तर केंद्र सरकाराला त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपये द्यावे लागतली यासाठी जनगणना होत नसल्याचा आरोप भुजबळांनी केलाय.  

 बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसीसह सर्वांची जनगणना करण्यात यावी,सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये,शाळांच्या खाजगीकरणाचा जीआर रद्द करावा अश्या अनेक मागण्या घेऊन ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी  शहापूर तालुक्यातील वालशेत या गावी भरत निचिते हे संविधान दिनी आमरण उपोषणास बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. या उपोषण मध्ये अनेक सामाजिक संघटनांनी समर्थन दिला असून या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ सह आमदार किसन कथोरे, आमदार शांताराम मोरे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांनी देखील भेट दिली. 

हेही वाचा : 

छगन भुजबळ पनवती, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागेही साडेसाती लागेल; जरांगेंची जहरी टीका

[ad_2]

Related posts