Yashomati Thakur on Unseasonal Rain Crop Loss : सरकारने सरसकट नुकसान भरपाई द्यावी( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राज्यामध्ये आठवडाभरापासून गारपीट आणि अवकाळी पावसानं थैमान घातलंय… हजारो हेक्टरवरील शेती पिकं अक्षरशः उध्वस्त झालीये…अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात तर वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झालीये… &nbsp;शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी दाटलंय…जेवढा मोठा बागायतदार तेवढं मोठं नुकसान अशीच काहीशी परिस्थिती झालीये… पारनेरच्या वडुले गावच्या पठारे कुटुंबाची.पारनेर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पारनेर तालुक्यात आले…आणि या शेतकऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला…पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केलीए</p>

Related posts