[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 साठी (Telangana Vidhan Sabha Election 2023) आज 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांच्या नेतृत्त्वातील भारत राष्ट्र समिती(Bharat Rashtra Samiti Telangana) सरकार सत्ता टिकवणार की काँग्रेस (Congress) बाजी मारणार हे काही वेळात स्पष्ट होईल. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागा आहेत. बहुमतासाठी 60 जागांची गरज आहे.
महाराष्ट्राला लागूनच असलेल्या तेलंगाणाचंही भविष्य अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. 2014 साली स्थापन झालेल्या तेलंगाणामध्ये स्थापनेपासून भारत राष्ट्र समितीची (Bharat Rashtra Samiti) सत्ता आहे. आणि त्याच पक्षाचे के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत. शेतकऱ्यांसाठीच्या योजना, उद्योगांना दिलेली सूट आणि मध्यम वर्गांमध्ये आकर्षक असा चेहरा असलेल्या केसीआर यांना पुन्हा सत्ता मिळेल असा विश्वास जाहीर केलं आहे. मात्र, त्यांना कडवं आव्हान दिलंय, काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा फायदा कर्नाटकात झाला. तसाच फायदा तेलंगाणातही होईल असा विश्वास काँग्रेसला आहे. शिवाय, केसीआर यांच्याविरोधातली नाराजीही काँग्रेसच्या फायद्याची ठरु शकते. असं असलं तरी ओवैसींची एमआयएम आणि भाजपलाही विसरुन चालणार नाही. तुलनेनं दोन्ही पक्षांचं इथं अस्तित्व फार नाहीय. मात्र, यावेळी स्थिती बदलली आहे
[ad_2]